डॉक्टरांनी मृत घोषित केलं; मध्यरात्री मुलगी म्हणाली, 'पप्पा हालचाल करतायेत', वाचा पुढे काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 04:27 PM2021-04-30T16:27:10+5:302021-04-30T16:34:41+5:30

Sultanpur News: डॉक्टरांनी नाडी आणि ऑक्सिजनची पातळी दोन्ही तपासली असता ते ठीक होते. दुःखाचे वातावरण असलेल्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली.

sultanpur doctors declared man dead in sultanpur daughter said at midnight papa is moving know what happened then  | डॉक्टरांनी मृत घोषित केलं; मध्यरात्री मुलगी म्हणाली, 'पप्पा हालचाल करतायेत', वाचा पुढे काय घडलं? 

डॉक्टरांनी मृत घोषित केलं; मध्यरात्री मुलगी म्हणाली, 'पप्पा हालचाल करतायेत', वाचा पुढे काय घडलं? 

Next
ठळक मुद्देकोतवाली नगर परिसरातील दारियापूर परिसरातील अब्दुल माबुद (50 वर्षे) यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

सुल्तानपूर : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाने एका रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील डॉक्टरांनी एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबात शोक पसरला. मृतदेह घरी आणला. मात्र, चिलरमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची हालचाल होत असल्याचे कुटुबीयांच्या निदर्शनास आले. हे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यानंतर त्यांनी लगेच शेजारच्या डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी नाडी आणि ऑक्सिजनची पातळी दोन्ही तपासली असता ते ठीक होते. दुःखाचे वातावरण असलेल्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली. ताबडतोब एक रुग्णवाहिका बोलविण्यात आली आणि त्या व्यक्तीला पुढील उपचारांसाठी लखनऊला नेण्यात आले. मात्र, सुमारे सात तासांनंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. (sultanpur doctors declared man dead in sultanpur daughter said at midnight papa is moving know what happened then)

कोतवाली नगर परिसरातील दारियापूर परिसरातील अब्दुल माबुद (50 वर्षे) यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अब्दुल यांना ऑक्सिजनची आवश्यकता होती. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांना शासकीय रुग्णालयात नेले. बराचवेळ विनंती केल्यानंतर 3-4 इंजेक्शन्स दिली गेली. यानंतरही अब्दुल यांना त्रास होत होता. ज्यावेळी ऑक्सिजनची मागणी केली गेली, त्यावेळी ऑक्सिजन सिलिंडर रिकामी नाही, असे सांगून डॉक्टरांनी बाजू काढली, असे अब्दुल यांच्या भावाची पत्नी शाहेदा बानो यांनी सांगितले. 

याचबरोबर, अब्दुल यांना बरे वाटत नव्हते म्हणून त्यांना सरकारी दवाखान्यातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची ऑक्सिजनची पातळीही खालावली होती. खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी अब्दुल यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यांनी ऑक्सिजन ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना घेऊन पुन्हा सरकारी रुग्णालयात जाण्यास भाग पडले. ज्यावेळी अब्दुल यांच्या छातीवर पंप करून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे शाहेदा बानो यांनी सांगितले.  

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबातील लोक सायंकाळी मृतदेह घेऊन घरी आले. नातेवाईकांना मृत्यूची माहिती देण्यात आली. शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार होते. त्यामुळे मृतदेह चिलरमध्ये ठेवण्यात आला होता. रात्री 11: 30–11: 45 च्या सुमारास त्या व्यक्तीची मुलगी सना अख्तर चिलरजवळ बसली होती. त्यावेळी चिलरमध्ये हालचाल होत असल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर चिलरमधून बाहेर काढण्यात आले आणि तसापणी केली असता श्वासोच्छ्वास चालू होता.

पुढील उपचारांसाठी लखनऊला पाठवले, पण...
माझ्या पुतणीने सांगितले की पप्पा हालचाल करत आहेत. चिल्लरमधून काढल्यानंतर पंचिंग केल्यावर लगेचच मला हृदयाचा ठोका जाणवला, त्यानंतर डॉक्टरांना बोलविले आणि त्यांनी तपासणी केली असता हाताची नाडी चालू होती. यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलवून लखनऊला रुग्णालयात येण्यात आले. मात्र शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, असे अब्दुल यांचे भाऊ माशूक म्हणाले.

Web Title: sultanpur doctors declared man dead in sultanpur daughter said at midnight papa is moving know what happened then 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.