सारांश..
By Admin | Published: August 12, 2015 11:53 PM2015-08-12T23:53:59+5:302015-08-12T23:53:59+5:30
>फूटपाथवरील अतिक्रमण हटविलेनागपूर : शहरातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. साई मंदिर प्रभागातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच हनुमाननगर, गांधीबाग, सतरंजीपुरा व धंतोली झोनमध्ये अशीच कारवाई केली जात आहे...शिक्षकांचे समायोजननागपूर : जिल्हा परिषदेच्या काही शाळात विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. परंतु शिक्षक अधिक आहेत. दुसरीकडे काही शाळात शिक्षक कमी व विद्यार्थी अधिक अशी स्थिती आहे. याचा शिक्षणावर परिणाम होत असल्याने पटसंख्येच्या आधारे शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...१५ ऑगस्टला कत्तलखाने बंदनागपूर : १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या विरोधात मनपातर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा विभागातर्फे देण्यात आला आहे. ...साहित्य वाटपासाठी १ कोटीनागपूर : जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृ षी साहित्याचे ५० टक्के अनुदानावर वाटप केले जाते यात फवारणी पॉवर स्प्रे साठी ५० लाख तर ऑईल इंजिन व मोटार पंप साठी ५० लाख अशी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यात लाभार्थीना ५० टक्के वाटा राहणार असल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी बुधवारी दिली.