ेसारांश
By Admin | Published: July 9, 2015 11:57 PM2015-07-09T23:57:45+5:302015-07-09T23:57:45+5:30
एनएचआरमधील कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण
ए एचआरमधील कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण नागपूर : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान , राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावरील पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहव चवरे म्हणाले, संघटनेने सातत्याने ही मागणी शासनाकडे लावून धरली होती. या मागणीला आता यश आले आहे. यानंतर सर्व कंत्राटी कामगारांना आरक्षण लागू राहणार आहे. ------सावरकरांच्या उडीत देशप्रेमाचे सामर्थ्यनागपूर : स्वा. सावरकर यांनी मार्सेलिस बंदरात घेतलेल्या उडीला एक शतक उलटले पण या प्रसंगामुळे आजही भारतीयांच्या मनात देशप्रेम उचंबळून येते, असे मत सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले. सावरकरांच्या उडीला १०५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना अभिवादन करणारा सोहळा आयोजित करण्यात आला. सावरकर अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत ठरले. त्यांनी स्वातंत्र्याचा लढा अधिक प्रखर केला त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळू शकले. देशासाठी मरणासन्न यातना सहन करणाऱ्या सावरकरांच्या कार्याने आजही देशप्रेमाची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. ------------सामाजिक कार्यानेच सन्मान मिळतोनागपूर : आदिम साहित्य संगीतीच्यावतीने मंगलमूर्ती सोनकुसरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रकाश दुलेवाले, नरेंद्र देवीकार, देवेंद्र बोकडे, चंद्रकांत सोनकुसरे, राजू कुंभारे, संदीप उरकुडे, हेमराज शिंदेकर, जितेंद्र सोनकुसरे, दुश्यंत बेलेकर आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यातून एक समाधान मिळते. असे काम करताना त्रास आणि अपमान होतो पण यश मिळाल्यावर समाजातून सन्मानही मिळतो. चांगल्या कामाची समाज नेहमीच दखल घेत असतो. माझ्या सामाजिक कार्यामुळेच माझा सत्कार झाला, असे ते म्हणाले. -------शिक्षणमहर्षी लीलाराम बजाज यांना आदरांजलीनागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटी, जरीपटकाचे संस्थापक लीलाराम बजाज यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना संस्थेच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्या वीणा बजाज, दीपक बजाज, डिम्पी बजाज, हरकिशनजी राजपाल, फतनदासजी वंजानी, प्रताप बजाज, के. एल. बजाज, खुशचंदजी प्रितमानी, टेकचंद ग्यानचंदानी, ज्योती दुहिलानी, राजकुमारी मेघराजानी, अनिल कोंगे, राजेश जग्यासी, शबनम वालदे, सोनिया वालिया प्रामुख्याने उपस्थित होेत्या. यावेळी सर्व अतिथींनी लीलाराम बजाज यांच्या कार्याचा परिचय भाषणातून दिला.