सारांश
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:04+5:302015-02-18T00:13:04+5:30
अजनी रिझर्व्हेशन कार्यालयाजवळ वाहतूक खोळंबा
Next
अ नी रिझर्व्हेशन कार्यालयाजवळ वाहतूक खोळंबानागपूर : अजनी येथील रिझर्व्हेशन कार्यालयासमोरील रस्ता बहुतेक सायंकाळच्या वेळी वाहतुकीने खोळंबतो. मेडिकल आणि अजनी भागातून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. पण चौकात सिग्नलची व्यवस्था नसल्याने आणि वाहतूक पोलीस येथे नसल्याने हा नित्याचाच अनुभव झाला आहे. वाहतूक खोळंबल्यावर पोलीस ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. पण वाहतूक खोळंबू नये म्हणून पोलिसांनी येथे स्थायी उपाय योजावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. -----व्हेरायटी चौकातील मोठ्या खड्ड्याकडे दुर्लक्ष नागपूर : व्हेरायटी चौक ते मुंजे चौक या मार्गावर म. गांधी यांच्या पुतळ्याजवळच एक मोठा आणि खोल खड्डा पडला आहे. वाहनांच्या आवागमनामुळे या खड्ड्याच्या बाजूला असलेली पाईपलाईन फुटली असून खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्डा किती खोल आहे, हे वाहनचालकांना कळत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. या खड्ड्यातून गाडी उसळल्याने एका लहान मुलालाही गंभीर इजा झाल्याची घटना येथे दोन दिवसांपूर्वी घडली. पण मुख्य रस्ता असूनही प्रशासनाला मात्र हा खड्डा दिसलेला नाही. हा जीवघेणा खड्डा बुजवून सातत्याने वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी पाईपलाईनचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील सीताबर्डी दुकानदार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.