सारांश

By admin | Published: February 18, 2015 11:54 PM2015-02-18T23:54:23+5:302015-02-18T23:54:23+5:30

शारदाप्रकरणी मतंगसिंह

Summary | सारांश

सारांश

Next
रदाप्रकरणी मतंगसिंह
यांच्या मदतनीसाची चौकशी
कोलकाता : शारदा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)बुधवारी माजी केंद्रीय मंत्री मतंगसिंह यांचे मदतनीस ख्याती सदाना यांची चौकशी केली़ ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतंगसिंह आणि शारदा समूहाचे मालक सुदीप्त सेन यांच्यातील आर्थिक व्यवहार आणि घोटाळ्यातील त्यांचा सहभाग याबाबत सदाना यांना प्रश्न विचारण्यात आले़ सुमारे दीड तास ही चौकशी झाली़ मतंगसिंह सध्या सीबीआय कोठडीत आहेत़
राज्यसभा खासदार
मनोरमा शर्मा यांचे निधन
डेहराडून : उत्तराखंडातून राज्यसभेवर गेलेल्या काँग्रेस खासदार मनोरमा शर्मा डोबरयाल यांचे बुधवारी सकाळी दिल्लीनजीकच्या गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले़ त्या ५५ वर्षांच्या होत्या़ पाच दिवसांपूर्वी त्यांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती़ शस्त्रक्रियेनंतरच काही समस्या उद्भवल्यानंतर त्यांची दुसर्‍यांदा शस्त्रक्रिया करावी लागली होती़ मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली़ गतवर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या़
प्राध्यापक व त्यांच्या
पत्नीवर गुंडांचा हल्ला
कानपूर : कानपूरमध्ये बुधवारी पहाटे अज्ञात गंुडांनी एक प्रा. ओमप्रकाश व त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडून हल्ला केला़ या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून मृत्यूशी झुंज देत आहे़ कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा कयास आहे़ गुंड सकाळी त्यांच्या घरात शिरले व त्यांनी दोघांवरही गोळ्या झाडल्या़ ओमप्रकाश यांच्या आई-वडिलांना मात्र त्यांनी काहीही केले नाही़
भारत-पाक सीमेवर
संशयित युवकास अटक
बिकानेर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सुरक्षा दलाने बुधवारी एका संशयित युवकास अटक केली़ त्याच्याकडून एक पिस्तूल आणि देशी दारू जप्त करण्यात आली़ एका गुप्त सूचनेच्या आधारावर सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुजावलपूर गावातून या युवकास अटक केली़ त्याचे नाव शिवकुमार अरोडा आहे़
ट्रक-कारची धडक
चौघांचा मृत्यू
हाथरस (उप्र) : हाथरस जिल्ह्याच्या बहता बम्बा भागात बुधवारी कार व ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले़ एका वळणावर ट्रकने कारला समोरून जबर धडक दिली़ कारमध्ये नऊ जण होते़ यापैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे़
तीन अल्पवयीन
मुलांकडून शस्त्र जप्त
मुरैना (मप्र) : तीन अल्पवयीन मुलांकडून पोलिसांनी बुधवारी एक रिव्हॉल्व्हर, दोन देशीकट्टे आणि काडतुसे जप्त केली़ आगर्‍यातील एका शस्त्रास्त्र तस्करांच्या टोळीशी या मुलांचा संबंध असल्याचे चौकशीतून समोर आले आहे़ यापैकी दोघे १७ वर्षे वयाची तर एक १६ वर्षांचा आहे़
विक्की त्यागी हत्येप्रकरणी
एक जण ताब्यात
मुजफ्फरनगर : गँगस्टर विक्की त्यागी याच्या कथित हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीस ताब्यात घेतले़ यादरम्यान त्यागीची आई प्रभा त्यागी यांनी स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याने या प्रकरणाची वरिष्ठ तपास संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे़ वकिलाच्या पोशाखात आलेल्या एका अल्पवयीन मारेकर्‍याने गत १६ फेबु्रवारीला विक्की त्यागीची गोळ्या घालून हत्या केली होती़

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.