सारांश
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:40+5:302015-07-12T23:56:40+5:30
राष्ट्र सेवा विद्यालयात नोटबूक वितरण
Next
र ष्ट्र सेवा विद्यालयात नोटबूक वितरण कोलबास्वामी देवस्थान, धापेवाडा व्यवस्थापक मंडळ, जैसाव वाडी यांच्या सौजन्याने राष्ट्र सेवा विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुणवंतराव बर्डीकर, सचिव राजेश धकाते, माजी अध्यक्ष महादेवराव बाजीराव, राजेंद्र नंदनवार, नीती कुंभारे, अजय पराते यांच्या हस्ते ९०० नोटबुक वितरित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका गजभिये यांनी शाळेच्या वार्षिक प्रगतीची माहिती यावेळी दिली. याप्रसंगी मान्यवरांनी शालांत परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संचालन खोब्रागडे तर आभार भुसारी यांनी मानले. ----------जामदार हायस्कूल येथे मोफत गणवेश वाटप नागपूर : आधुनिक काळात इंग्रजी शाळांचा समाज मनावर पडलेला वाढता प्रभाव पाहता जामदार शिक्षण संस्थेने गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला. पण शाळेतील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यासाठी व्हर्लपूल कंपनीचे अजय चुडामासा व त्यांचे सहकारी सुनील बंगाले, कुलदीप दुबे, राजन परिहार, आकाश तिरोडे यांनी ३६ हजार रुपये शाळेला प्रदान केले. या निधीतून जामदार हायस्कूलतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले. माजी विद्यार्थी गिरीश जनई यांनीही याकामासाठी तीनहजार रुपयांची मदत केली.