सारांश
By Admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30
अजनी रेल्वे पुलावर धोकादायक खड्डा
अ नी रेल्वे पुलावर धोकादायक खड्डानागपूर : अजनी रेल्वे पुलावरील रस्त्यावर मधोमध खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविण्यात अनेक वाहनधारक अपघाताला सामोरा जात आहे, तर काही खड्ड्यात अडकून जखमी होत आहे. विशेष म्हणजे, या मार्गाने मंत्री, आमदार, नगरसेवक रहदारी करतात, मात्र अद्यापही अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेडिकलमध्ये श्वानांचा सुळसुळाटनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षक कक्षाच्या परिसरातच कुत्रे फिरत असताना देखील कुणाचेच लक्ष नाही. डागाला ५०० खाटांची प्रतीक्षानागपूर : शासकीय डागा रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ४८ खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग, यासहित इतर सुविधा नव्याने निर्माण करून अतिशय सुयोग्य उदाहरण राज्यासमोर ठेवले आहे. रुग्णालयाच्या मेहनतीमुळे शासनाने ५०० खाटांचे रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला. परंतु दीड वर्षे होऊनही यासंदर्भातील कामे सुरू झालेली नाहीत. नवीन बाभुळखेडा रस्त्याची दुर्दशानागपूर : नवीन बाभुळखेडा येथील गल्ली नंबर ३ पासून ते १७ पर्यंत रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अरुंद रस्ता, यातच डांबरीकरणही उखडल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. आमदार, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.डागा रुग्णालयाच्या मुख्य द्वारावरच अतिक्रमणनागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अतिक्रमण होत असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैद्यकीय अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.