सारांश...
By Admin | Published: July 12, 2015 11:56 PM2015-07-12T23:56:33+5:302015-07-12T23:56:33+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट
स वानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीटनागपूर : कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सेवार्थ वेतन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांना ही प्रणाली हाताळण्याचे तांत्रिक ज्ञान नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पायपीट करावी लागत आहे....विकासासाठी १० कोटीनागपूर : महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या नरसाळा व हुडकेश्वर भागातील विकास कामासाठी अर्थसंकल्पात १० कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या भागातील रस्ते, वीज, गडरलाईन व पाणीपुरवठा अशी मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागतील अशी आशा आहे. .....तलाव दुरुस्ती रखडलीनागपूर : मनसर येथील मालगुजारी तलावाचे गेट दुरुस्तीचे काम दोन वर्षापासून प्रलंबित आहे. याचा सिंचन क्षमतेवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. सिंचन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे....शहरातील सफाईकडे दुर्लक्षनागपूर : पावसाळ्याच्या दिवसात साथ रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु या विभागाकडे शहरातील सफाई व कचरा उचलण्याची जबाबदारी आहे. याकडे विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.