सारांश - जोड

By admin | Published: June 26, 2015 01:05 AM2015-06-26T01:05:37+5:302015-06-26T01:05:37+5:30

पाचपावली शंकर मंदिरात भागवत

Summary - Addition | सारांश - जोड

सारांश - जोड

Next
चपावली शंकर मंदिरात भागवत
नागपूर : पाचपावली शंकर मंदिरात अधिक मासानिमित्त प्रसिद्ध भागवताचार्य प्रशांतबुवा धर्मगिरीकर यांचे भागवतावर प्रवचन सुरू आहे. या उपक्रमाचे आयोजन महादेव भिसीकर, राजेश बोकडे, परसराम भिसीकर, आनंद ठवरे, बळीराम अंड्रस्कर, दशरथ महाजन, विजय पटेल, पंढरीनाथ पाठराबे यांनी केले. भागवताच्या श्रवणासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात.
शालेय शिक्षण कार्यालयाचा मार्ग खराब
नागपूर : शालेय शिक्षण प्राथमिक उपशिक्षणाधिकारी कार्यालयाचा शोध घेणे अतिशय कठीण आहे. शाळा सुरू होत असल्याने पुस्तकाचे वाटप, प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू आहेत. पटवर्धन शाळेच्या मागे उपशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात जाण्याचा मार्ग अतिशय खराब आहे. पावसामुळे या मार्गावर चिखल साचल्याने वाहने चिखलात फसत आहेत. पायी जाताना चिखलाने पाय भरतात. कार्यालयापर्यंत रस्ता बनवावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील गाईंचा वाहतुकीस अडथळा
नागपूर : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाईंचा कळप रस्ता अडवून बसतो. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हा प्रकार मोठ्या अपघातालाही निमंत्रण देण्याचा आहे. पावसाळ्यात बरेचदा रात्रीला लाईट नसतात. वाहने सुसाट वेगाने धावतात. अशात गाई आडव्या आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. रस्ता अडवून बसणाऱ्या गाईंचा बंदोबस्त महापालिकेने करावा, अशी मागणी होत आहे.
बालाजीनगरात रस्त्यावरील पाणी वाहून जाणारे गटार बुजविले
नागपूर : रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेली गटार बुजविण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वी या गटाराची स्वच्छता न करण्यात आल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचते आहे. रस्त्यावरील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने रहिवाशांच्या घरातही पाणी शिरते. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे आजाराची शक्यता बळावली आहे.

Web Title: Summary - Addition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.