सारांश न्यूज
By admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:49+5:302015-09-02T23:31:49+5:30
‘कुटुंब रंगलंय अर्थात’वर मार्गदर्शन
Next
‘ ुटुंब रंगलंय अर्थात’वर मार्गदर्शनसोलापूर: कोटक म्युच्युअल फंड आणि अमृतवेल मीडिया ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि. 4 सप्टेंबर) रोजी सायंकाळी 5.30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटर येथे कोटक म्युच्युअल फंडचे सुधीर भगत यांचे ‘कुटुंब रंगलंय अर्थात’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक धर्मेंद्र पवार यांनी केले आहे. वीज मंडळ निवृत्त नागरिकांची बैठकसोलापूर: भारतीय मजदूर संघाशी संलग्न वीज मंडळ सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची बैठक रेल्वे लाईन्स येथे अनंत मोडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी 28 नोव्हेंबरमध्ये आळंदी येथे होणार्या संघटनेच्या अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ई.पी.एस. वेटेजचा लाभ मयत कर्मचार्यांच्या वारसांना मिळावा अशी मागणी आर. पी. एफ. आयुक्तांकडे करावी, असे सुचविण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. वालचंदमध्ये पदव्युत्तर वाड्मय मंडळसोलापूर: वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या पदव्युत्तर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा वाड्मय मंडळाचा शुभारंभ प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी भाव आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी भाषा सक्षम माध्यम असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे, आरती आलीबादे, भाग्यर्शी माळी, समिना बिजली, प्रज्ञा देशमुख, प्रा. डॉ.कोटी, प्रा. नवले, प्रा. रेळेकर, प्रा. कोळी आदी उपस्थित होते.पालक-शिक्षक मेळावासोलापूर: वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात पालक-शिक्षक मेळावा पार पडला. यावेळी डॉ. आर. व्ही. हिप्परगी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती उत्तम चौगुले, डॉ. सी. एस. चव्हाण, एस. एन. बत्तीन यांनी दिली. पालकांच्या प्रश्नांना डॉ. एस. व्ही. कोटी आणि प्राचार्य माणिकशेटे यांनी उत्तर देऊन समाधान केले. पालकांनीही आपल्या पाल्यांची शैक्षणिक माहिती जाणून घेतली.