सारांश बातम्या.....

By admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30

महिला कैद्याला संचित रजा

Summary News | सारांश बातम्या.....

सारांश बातम्या.....

Next
िला कैद्याला संचित रजा
नागपूर : हायकोर्टाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील महिला कैदी ताराबाई चव्हाणला १४ दिवसांची संचित रजा (फर्लो) मंजूर केली आहे. यापूर्वी संचित व अभिवचन रजा मंजूर केली असता वेळेवर आत्मसमर्पण केले नाही म्हणून कारागृह प्रशासनाने ताराबाईचा रजेचा अर्ज फेटाळला होता. यामुळे तिने हायकोर्टात धाव घेतली होती.
वृक्षकत्तलीची चौकशीची कुठपर्यंत
नागपूर : रामटेक तालुक्यातील मौजा सत्रापूर येथे १ लाखावर वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली आहे. या गैरप्रकारात सामील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी कुठपर्यंत पोहोचली, अशी विचारणा हायकोर्टाने केली आहे. यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाने ८ ऑगस्टपर्यंत वेळ घेतला आहे. यासंदर्भात अनिल मुलमुले यांनी याचिका दाखल केली आहे.
चंद्रपूर वीज प्रकल्प, सुनावणी तहकूब
नागपूर : चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पामुळे वेगाने प्रदूषण वाढत असल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने १२ ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेने ही याचिका दाखल केली आहे. दोन संच जुने झाल्यामुळे विषारी वायू जास्त प्रमाणात बाहेर पडत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Summary News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.