भारत-पाकच्या उपउच्चायुक्तांना समन्स
By admin | Published: November 10, 2016 05:26 AM2016-11-10T05:26:17+5:302016-11-10T05:26:17+5:30
अतिरेक्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानने सीमा भागात चालविलेल्या बेछूट गोळीबाराचा भारत सरकारने तीव्र निषेध केला
इस्लामाबाद / नवी दिल्ली : अतिरेक्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानने सीमा भागात चालविलेल्या बेछूट गोळीबाराचा भारत सरकारने तीव्र निषेध केला असतानाच नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा भारतावर उलट आरोप करीत पाकने भारतीय उपउच्चायुक्तांना जाब विचारण्यासाठी बोलावून घेतले आहे. तर भारतानेही त्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावले. पाकिस्तानने भारतीय उपउच्चायुक्तांना बोलावण्याची गेल्या दोन आठवड्यांमधील ही सहावी वेळ आहे.
महासंचालक (दक्षिण आशिया आणि सार्क) मोहम्मद फैजल यांनी भारतीय उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांना बोलावून घेतले आणि
८ नोव्हेंबर रोजी खुईराटा व
बट्टाल सेक्टरमधील नियंत्रण रेषेलगत भारतीय सैनिकांनी
केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल निषेध नोंदविला, अशी माहिती पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. (वृत्तसंस्था)