कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स

By admin | Published: March 11, 2015 10:23 AM2015-03-11T10:23:33+5:302015-03-11T11:50:05+5:30

कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी पटियाला हाऊसच्या विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स बजावले आहे.

Summons Manmohan Singh for coal scam | कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स

कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी पटियाला हाऊसच्या विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स बजावले आहे. ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी हिंदालको कंपनीचे कुमार मंगलम बिर्ला, पी.सी.पारेख यांच्यासह आणखी तिघांना आरोपी म्हणून समन्स बजावले आहे. गुन्ह्याचा कट, विश्वासघात आणि भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने समन्स बजावले आहे.
कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने यापूर्वी मनमोहन सिंग यांची चौकशी केली होती. 
सन २००५ मध्ये हिंदाल्कोला तालाबीरा-२ या कोळसा खाणपट्ट्याचे वाटप केले गेले होते़ त्या वेळी कोळसा मंत्रालयाचा कार्यभार मनमोहन सिंग यांच्याकडे होता. सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र त्यानंतर विशेष न्यायाधीश भरत पराशर यांच्या न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सीबीआयकडे पाठवत पुढील चौकशीचे आदेश दिले़. तत्कालीन कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांचा विविध पैलूंवर आधी जबाब नोंदवणे योग्य ठरेल, असे सांगत न्यायालयाने सदर प्रकरणी आणखी चौकशीची गरज अधोरेखित केली. त्यानंतर मनमोहन सिंग यांची चौकशी करण्यात आली.
दरम्यान समन्स बजावण्यात आल्यामुळे मी दु:खी असलो तरी कोणत्याही चौकशीस तयार असल्याची प्रतिक्रिया मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
 

Web Title: Summons Manmohan Singh for coal scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.