विषबाधेमुळे झाला सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू
By admin | Published: October 10, 2014 10:37 AM2014-10-10T10:37:47+5:302014-10-10T10:37:52+5:30
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा अहवाल दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाने शुक्रवारी नवीन वळण घेतले आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा अहवाल दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. औषधांचे अतिसेवन किंवा विष मिश्रीत पदार्थामुळे सुनंदा यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
सुनंदा पुष्कर यांचा फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील लीला या पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत मृतदेह आढळला होता. पुष्कर यांच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर येत नव्हते. अखेरीस पोलिसांनी पुष्कर यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता. याविषयीचा अहवाल दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. या अहवालात पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे म्हटले आहे. व्हिसेराचा अहवाल आल्याने दिल्ली पोलिस या प्रकरणाविषयी लवकरच अंतिम रिपोर्ट तयार करेल असे सूत्रांनी सांगितले.