सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून मेहेर तरार यांची 3 तास चौकशी
By admin | Published: July 18, 2016 10:08 AM2016-07-18T10:08:13+5:302016-07-18T10:09:48+5:30
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांची दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चौकशी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 18 - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांची चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही चौकशी केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही चौकशी करण्यात आली. शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी मृतदेह सापडला होता.
सुनंदा यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार व थरुर यांच्या संबंधाबाबत ट्विट केल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी त्यांचा मृतदेह आढळला होता. चौकशीसाठी मेहेर तरार भारतात आल्या होत्या. मध्य दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी डिसेंबर महिन्यात चौकशीत सहकार्य करण्यासंबंधी पत्र पाठवलं होतं, ज्याला मेहेर तरार यांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं.
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेकांकडून मेहेर तरार यांचं नाव समोर आलं होतं. यामध्ये सुनंदा पुष्कर यांची जवळची मैत्रीण आणि पत्रकार नलिनी सिंग यांचाही समावेश होता. सुनंदा पुष्करने शशी थरुर आणि मेहेर यांच्यामध्ये झालेलं बीबीएम संभाषण मिळण्यासाठी माझी मदत मागितली होती. शशी थरुर लोकसभा 2014 निवडणुकीनंतर मेहेर तरारशी लग्न करणार होते असंही सुनंदा पुष्करने सांगितल्याची माहिती नलिनी सिंग यांनी पोलिसांना दिली होती.
मेहेर तरार यांनी शशी थरुर यांच्याशी कोणतेही जवळचे संबंध नसल्याचं सांगितलं आहे. सुनंदा पुष्करसोबत जानेवारी / फेब्रुवारी 2014 मध्ये झालेल्या भांडणाबद्दलही मेहेर तरार यांच्याकडे चौकशी करण्यात आली. महिला पोलीस अधिका-यांच्या उपस्थितीत तब्बल 3 तास मेहेर तरार यांची चौकशी कऱण्यात आली. मेहेर तरार यांनी सहकार्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.