सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : शशी थरूर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 06:31 AM2018-07-04T06:31:00+5:302018-07-04T06:31:00+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूशी संबंधित खटल्यात दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन मागणारा अर्ज केला.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूशी संबंधित खटल्यात दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन मागणारा अर्ज केला.
अर्जावर उद्या, बुधवारी सुनावणी होईल. सुनंदा पुष्कर यांना क्रूरतेने वागवणे आणि त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप शशी थरूर यांच्यावर आहेत. वकील विकास पाहवा यांच्या मार्फत दाखल केलेल्या आपल्या या अर्जात थरूर म्हणाले की, अटक न करताच आरोपपत्र दाखल करण्यात आले असून एसआयटीने म्हटले आहे की तपास संपला असून कोठडीतील चौकशीची गरज नाही.
अटक न करता आरोपपत्र दाखल केले गेल्यास जामीन अटळ आहे, असे कायदा म्हणतो. त्यामुळे आम्ही संरक्षणासाठी विनंती केली आहे म्हणजे आम्हाला ७ जुलै रोजी न्यायालयात हजर राहता येईल, असे थरूर यांच्यातर्फे सांगण्यात आले.