सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह घटकांमुळे नाही - FBI

By admin | Published: November 11, 2015 10:20 AM2015-11-11T10:20:37+5:302015-11-11T10:36:08+5:30

काँग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य रेडिओअॅक्टिव्ह घटकांमुळे झाला नाही असा अहवाल अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने दिला आहे.

Sunanda Pushkar's death is not due to radioactive elements - FBI | सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह घटकांमुळे नाही - FBI

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह घटकांमुळे नाही - FBI

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ११ - काँग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य रेडिओअॅक्टिव्ह घटकांमुळे झाला नाही असा अहवाल अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने दिला आहे. एफबीआयने सुनंदा यांचा मृत्यू कोणत्या विषामुळे झाला याचे नावही दिले असून यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या पथकाच्या हाती मोठा दुवा लागला आहे.

जानेवारी २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद स्थितीत मृत्य झाल्या होता. सुनंदा यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नेमका कशाने मृत्यू झाला हे स्पष्ट होत नव्हते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सुनंदा यांचा व्हिसेरा तपासणीसाठी अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. एफबीआयने दिल्ली पोलिसांना ईमेलव्दारे अहवाल पाठवल्याचे वृत्त 'द हिंदू' या वृत्तपत्राने दिले आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह घटकांमधील विषामुळे झाला असावा अशी चर्चा होती. एफबीआयने हा दावाच फेटाळून लावला आहे. यासंबंधी दिल्लीचे पोलिस आयुक्त बी एस बस्सी म्हणाले, लवकरच या प्रकरणातील काही महत्त्वाच्या गोष्टी उघड होतील. एफबीआयच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे याविषयी त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही.  

 

Web Title: Sunanda Pushkar's death is not due to radioactive elements - FBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.