''देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 09:26 AM2019-11-28T09:26:08+5:302019-11-28T09:26:36+5:30
मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे.
नवी दिल्लीः अयोध्या प्रकरणातल्या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे. देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडत असल्याचं वादग्रस्त विधान मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी केलं. परंतु या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. माझ्या विधानाचा मीडियानं विपर्यास केल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, देशात शांती-सौहार्द मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात. तसेच मुस्लिमांवर नेहमीच अन्याय होत आला आहे, असं राजीव धवन म्हणाले आहेत. राजीव धवन यांच्या विधानावरून झालेल्या टीकेनंतर त्यांनी मी असं म्हटलंच नसल्याचं सांगितलं. टीव्हीच्या माध्यमातून ही करामत करण्यात आलेली आहे. मी जेव्हा हिंदूंसंदर्भात बोलतो तेव्हा असं नाही की मी सर्वच हिंदूबद्दल बोलतो.
Advocate Rajeev Dhavan, who represented Sunni Central Waqf Board in Ayodhya case on his reported statement,'It is Hindus, not Muslims who disturb peace': This is television mischief. When I speak of Hindus, I am not speaking of Hindus generally. pic.twitter.com/FBVaZbjgL5
— ANI (@ANI) November 27, 2019
राजीव धवन यांनी संघावरही निशाणा साधला . जेव्हा बाबरी मशीद प्रकरणात हिंदू शब्दाचा वापर केला जातो, त्याचा अर्थ संघ परिवार असा असतो. मी कोर्टातही सांगितलं आहे की, ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते हिंदू तालिबानी होते. त्यावेळी मी संघ परिवार आणि त्या विशिष्ट वर्गासंबंधी बोलतो होतो, जे हिंसा आणि लिंचिंगसारख्या प्रकारांना पाठबळ देतात. एकंदरीतच राजीव धवन यांच्या विधानावरून मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
Rajeev Dhavan: When the word Hindu is used in its context it means 'sangh parivar',in relation to Babri Masjid. In court I told people who destroyed Babri Masjid that they were Hindu Taliban.I'm speaking of those sections of 'sangh parivar' who are dedicated to violence&lynching. https://t.co/WxvhQyCUKV
— ANI (@ANI) November 27, 2019