सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही

By महेश गलांडे | Published: January 27, 2021 05:04 PM2021-01-27T17:04:03+5:302021-01-27T17:04:24+5:30

दीप सिद्धूने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. "आम्ही आमच्या लोकशाही हक्कांतर्गत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फक्त निशाण साहिबचा झेंडा फडकवला, तेथून तिरंगा काढला गेला नाही

Sunny Deol's explanation, I have nothing to do with Deep Sidhu | सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही

सनी देओलचं स्पष्टीकरण, दीप सिद्धूसोबत माझा कसलाही संबंध नाही

Next
ठळक मुद्देदीप सिद्धू यांचा जन्म १९८४ मध्ये पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. दीप यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. त्याने किंगफिशर मॉडेलचा पुरस्कारही जिंकला आहे. २०१५ मध्ये दीप पहिला पंजाबी चित्रपट रमता जोगी प्रदर्शित झाला

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला गालबोट लागले असून हिसांचारामुळे राजधानी दिल्लीत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलाच्या तुकड्या दिल्लीत तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, लाल किल्ला परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. लाल किल्ल्यावर आंदोलनकर्त्यांनी धार्मिक ध्वज फडकवल्यानंतर सोशल मीडियातूनही चर्चेला उधाण आले असून दीप सिद्धू यांस जबाबदार धरण्यात येत आहेत. ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दीप सिद्धू यांना उपद्रव करायला उद्युक्त केले, त्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याकडे कूच केली. याबाबत अभिनेता सनी देओलने ट्विट करुन या घटनेनं मी दु:खी झाल्याचं म्हटंलय. 

दीप सिद्धूने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. "आम्ही आमच्या लोकशाही हक्कांतर्गत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फक्त निशाण साहिबचा झेंडा फडकवला, तेथून तिरंगा काढला गेला नाही." मंगळवारी एका ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकर्‍यांच्या गटाने लाल किल्ल्यावर धडक दिली. लाल किल्ल्याच्या या घटनेनंतर शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धूपासून स्वत: ला वेगळे केलं आहे. तर, खासदार आणि अभिनेता सनी देओलनेही दीप सिद्धूसोबत माझा किंवा माझ्या परिवाराचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. त्यासोबतच, प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर जे घडलं, त्यामुळे मी खूप दु:खी झालोय, असेही सनीनं सांगितलं. यापूर्वीच, 6 डिसेंबर रोजी मी दीप सिद्धूशी संबंध नसल्याचेंही सनी म्हणाला. 

दीप सिद्धू कोण आहेत? 

दीप सिद्धू यांचा जन्म १९८४ मध्ये पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. दीप यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. त्याने किंगफिशर मॉडेलचा पुरस्कारही जिंकला आहे. २०१५ मध्ये दीप पहिला पंजाबी चित्रपट रमता जोगी प्रदर्शित झाला. यानंतर दीपची लोकप्रियता 2018 मध्ये आलेल्या जोरा दस नंबरिया या चित्रपटापासून वाढली. या चित्रपटात त्याने गॅगस्टरची मुख्य भूमिका केली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपा खासदार सनी देओल यांनी दीप यांना गुरदासपूरमधील त्यांच्या निवडणूक प्रचार संघात समाविष्ट केले. लाल किल्ल्याची गडबड झाल्यानंतर भाजपा खासदारांनी दीपपासून स्वतःला दूर केले. सनी देओल यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "गेल्या 6 डिसेंबर रोजी मी म्हणालो होतो की दीप सिद्धूशी माझे आणि माझे कुटुंबियांचा काही संबंध नाही".

शेतकरी चळवळीशी जोडलेला आहे दीप 

दीप हे आधीपासूनच शेतकरी चळवळीशी संबंधित आहेत. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी दिल्ली-हरियाणा येथील  शेतकऱ्यांनी शंभू येथे निदर्शने केली. दीप या चळवळीतील अनेक कार्यकर्ते आणि कलाकारांसह सहभागी होता. या चळवळीत दीप शंभू सीमेवर शेतकर्‍यांसह बसलेला दिसला होता. शेतकरी चळवळीत दीप सिद्धू यांच्या सहभागावर अनेक शेतकरी नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दीप यांनी 'भाजपा-आरएसएस'चा एजंट असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सनी देओल यांच्यासमवेत दीपचे एक चित्र समोर आले आहे. दीपने मात्र आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले.  
 

Web Title: Sunny Deol's explanation, I have nothing to do with Deep Sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.