सनी लिओनच्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा , मुलाखतकारावर कडाडून टीका

By admin | Published: January 20, 2016 03:39 AM2016-01-20T03:39:49+5:302016-01-20T03:39:49+5:30

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनची एक मुलाखत सध्या जोरदार गाजत आहे. ठरावीक साच्यातील आणि पूर्वग्रहांवर आधारीत असे प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Sunny Leone interviews everywhere and criticizes the interview | सनी लिओनच्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा , मुलाखतकारावर कडाडून टीका

सनी लिओनच्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा , मुलाखतकारावर कडाडून टीका

Next
>मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनची एक मुलाखत सध्या जोरदार गाजत आहे. ठरावीक साच्यातील आणि पूर्वग्रहांवर आधारीत असे प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळेस सनीला केवळ तिच्या एकेकाळी पॉर्नस्टार असण्यावर आणि ती काहीशी कमी महत्वाची असल्यासारखे दाखवत विचारल्याचा आरोप मुलाखतकार भूपेंद्र चौबे यांच्यावर टीका होत आहे. विशेष म्हणजे सनी लिओनने यापैकी प्रत्येक प्रश्नाला अत्यंत शांतपणे आणि न डगमगता उत्तरे दिली. तीस मिनिटांच्या मुलाखतीमध्ये वारंवार तिच्या भूतकाळावर प्रश्न विचारण्यात आले तरिही तिने त्याला उत्तरे दिली.
तुमच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला अभिमान आहे का, आमिर खान तुमच्याबरोबर काम करेल का, बॉलीवूडच्या भाषेत तुम्ही आयटम गर्ल आहात, किती लोकांना पॉर्नस्टार होण्याची इच्छा असते असे प्रश्न विचारल्यामुळे चौबे हे स्त्रीविरोधी असल्याची टीका सर्वत्र होत आहे. मुलाखतकाराचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बॉलीवूडसह टष्ट्वीटरवर व्यक्त होत आहेत. मुलाखतकाराच्या या धक्कादायक प्रश्नांवर ऋषी कपूर, आलिया भट्ट, दिया मिर्झा, सुशांत राजपूत यांनी टीकेची झोड उठविली आहे. दिवसभर टष्ट्वीटरवर याबाबत चर्चा सुरुच राहिली आणि पुरुषी मानसिकतेतून साचेबद्ध येणाऱ्या प्रश्नांवरही अनेकांनी संताप व्यक्त केला. अर्थात चौबे यांनी आपला असा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Sunny Leone interviews everywhere and criticizes the interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.