प्रचाराला ‘सनस्ट्रोक’

By admin | Published: October 8, 2014 01:14 AM2014-10-08T01:14:18+5:302014-10-08T01:14:18+5:30

१२ ते ३ दरम्यान प्रचंड उष्म्यास सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी या ३ तासाच्या काळात प्रचार करणे टाळले आहे

'Sunstroke' campaign | प्रचाराला ‘सनस्ट्रोक’

प्रचाराला ‘सनस्ट्रोक’

Next

वसई : आॅक्टोबर हिटचा उमेदवारांच्या प्रचारावर परिणाम भयंकर होऊ लागला असून १२ ते ३ दरम्यान प्रचंड उष्म्यास सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी या ३ तासाच्या काळात प्रचार करणे टाळले आहे. उष्म्यामध्ये अधिक वाढ झाल्यास हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांची अनेक कार्यालयेही दुपारच्या वेळी ओस पडतात. गरम हवा व कडक ऊन यामुळे कार्यकर्ते कार्यालयात बसण्याऐवजी घरी बसणेच पसंत करतात. दुपारी ४ नंतर मात्र कार्यालये पुन्हा गजबजतात ते थेट रात्री १२ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची वर्दळ सुरूच असते.
४ ते ५ दिवसापासून वसईत उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेचा पारा ३९ अंशावर गेल्यामुळे दुपारी मतदारही भेटण्यास उत्सुक न्नसतात. परिणामी, १२ ते ३ दरम्यान सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार थंडावतो.
उष्णतेचा कहर असाच राहीला तर त्याचा प्रचारावरही परिणाम होण्याची भीती कार्यकर्त्यांमध्ये आहे. याला तोंड देत देतच कार्यकर्ते १५ आॅक्टो.ला होणाऱ्या मतदानाच्या पुर्वतयारीला लागले आहेत. पोलिंग एजंट व सहाय्यकाची यादी तयार करणे, मतदानासाठी मतदारांना मतदानकेंद्रावर आणणे, दुपारी एजंट्सना वेळेवर जेवण देणे आणि संध्याकाळी त्यांच्याकडूनच या एजंटांकडून मतदानाची केंद्रनिहाय टक्केवारी मिळवणे अशी सर्व
कामे हातावेगळी होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sunstroke' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.