Super Cyclone Yaas: तौक्ते पाठोपाठ दुसरे Yaas चक्रीवादळ धडकणार; बंगाल उपसागराचे तापमान वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 02:02 PM2021-05-19T14:02:55+5:302021-05-19T14:06:06+5:30
Super Cyclone Yaas will hit west bengal, odisha: तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे.
Super Cyclone Yaas is coming: तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. येत्या 23 मे रोजी हे यास चक्रीवादळ (Cyclone Yaas) पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. (After Cyclone Tauktae, another cyclone with a low-pressure area to form over the east-central Bay of Bengal around May 23)
तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये 14 जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर 184 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत. तसेच अनेक भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून वीजही खंडित झालेली आहे. असे असताना चार-पाच दिवसांच्या फरकाने आणखी एक मोठे चक्रीवादळ देशावर घोंघावू लागले आहे. (second cyclone yaas to hit India next week.)
Cyclone Tauktae: 11 तास समुद्राच्या पाण्यात, नौदलामुळे आम्ही जिवंत!; ONGC कामगार ढसाढसा रडला
ओमानने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढले आहे. सध्या ते 31 डिग्री सेल्सिअस आहे. असे असले तरीदेखील यास चक्रीवादळ तौक्ते एवढे ताकदवर नाहीय. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने येत आहे, असे अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे.
सध्यातरी हे वादळ भारतापासून लांब आहे. जेव्हा हे वादळ भारतीय हवामानाच्या पट्ट्यात प्रवेश करेल तेव्हा आम्ही आमच्या हवामान बुलेटीनमध्ये याचा समावेश करणार आहोत. सध्यातरी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हे वादळ पुढील आठवड्यात धडकण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे चक्रीवादळ टीमच्या प्रमुख सुनिता देवी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आलेल्या तौत्के Tauktae चक्रीवादळाने हाहाकार माजवला. या वादळामुळे महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर १० हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे.