बापरे! 2023 मध्ये कोरोनानंतर 'सुपरबग'चा मोठा धोका; वर्षभरात 1 कोटी लोकांचा जाऊ शकतो जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:54 AM2023-01-03T11:54:10+5:302023-01-03T12:05:17+5:30

अमेरिकेत माणसांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकले आहे.

superbug will become the second biggest threat after corona in 2023 can kill 10 million people in year | बापरे! 2023 मध्ये कोरोनानंतर 'सुपरबग'चा मोठा धोका; वर्षभरात 1 कोटी लोकांचा जाऊ शकतो जीव

बापरे! 2023 मध्ये कोरोनानंतर 'सुपरबग'चा मोठा धोका; वर्षभरात 1 कोटी लोकांचा जाऊ शकतो जीव

Next

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. दरवर्षी नव्या व्हेरिएंटसह, ही महामारी लोकांना फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत करत आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेत माणसांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकले आहे. या सुपरबगने गेल्या काही वर्षांत मेडिकल सायन्ससमोर एक मोठे आव्हान उभं केलं आहे. अशा परिस्थितीत कोविड-19 चा संसर्ग अधिकच धोकादायक बनत आहे. 

मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, जर हा सुपरबग याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. सध्या या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटी-फंगल औषधे देखील सुपरबग्सवर परिणाम करत नाहीत, असे लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आले आहे. सुपरबग्स हे एक बॅक्टेरियाचं रुप आहे. 

काही बॅक्टेरिया हे मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. हा सुपरबग मानवांसाठी घातक आहे. हा बॅक्टीरिया, व्हायरस आणि पॅरासाइटचा एक स्ट्रेन आहे. जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस किंवा पॅरासाइट्सवेळेनुसार बदलतात, तेव्हा औषध त्यांच्यावर परिणाम करणे थांबवते. सुपरबग हे कोणच्याही अँटीबायोटिक औषधांच्या वापरामुळे हो निर्माण होतो. 

डॉक्टरांच्या मते, फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटीबायोटिक्स घेतल्यास, सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे हळूहळू इतर मानवांना देखील संसर्ग होतो. लॅन्सेटने कोरोना महामारीच्या काळात काही दिवसांपूर्वी सुपरबगमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये, ICMR ने 10 रुग्णालयांमध्ये एक अभ्यास केला आणि असे आढळून आले की, कोरोना व्हायरसनंतर लोकांनी जास्त अँटीबायोटिक्स वापरण्यास सुरुवात केली आहे.

अँटिबायोटिक्स आणि सुपरबग्सच्या अतिवापरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कोविड रुग्णांपैकी 50  टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचारादरम्यान किंवा नंतर बॅक्टेरिया किंवा फंगसमुळे संसर्ग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या अभ्यासानुसार, जगात अँटिबायोटिक्सचा वापर याच दराने वाढत राहिला तर मेडिकल सायन्सची सर्व प्रगती शून्य होईल. 

सुपरबगचा उद्रेक कसा टाळायचा?

- सुपरबग टाळण्यासाठी, प्रथम साबण आणि पाण्याने हात धुवा.
- हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरा.
- खाद्यपदार्थ स्वच्छ ठिकाणी ठेवा.
- अन्न नीट शिजवून घ्या आणि स्वच्छ पाणी वापरा.
- आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळा.
- डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही अँटीबायोटिकचा वापर करा.
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: superbug will become the second biggest threat after corona in 2023 can kill 10 million people in year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.