येत्या रविवारी रात्री दिसणार सुपरमून ! जाणून घ्या का म्हणतात याला सुपरमून ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 02:28 PM2017-11-29T14:28:39+5:302017-11-29T15:04:07+5:30

येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ' सुपरमून ' दिसणार , यापूर्वी  १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते.

Superman will appear on the Sunday night! Know the name of this superman? | येत्या रविवारी रात्री दिसणार सुपरमून ! जाणून घ्या का म्हणतात याला सुपरमून ?

येत्या रविवारी रात्री दिसणार सुपरमून ! जाणून घ्या का म्हणतात याला सुपरमून ?

Next

मुंबई - येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ' सुपरमून ' दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ' सुपरमून ' म्हटले  जाते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मीटर अंतरावर असतो. परंतु  यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार कि.मीटर अंतरावर येणार आहे. सुपरमून योगाच्यावेळी पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे चौदा टक्के मोठे आणि सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसते. सन १९७९ मध्ये रिचर्ड नोले यांनी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्रास सर्वप्रथम ' सुपरमून ' असे नाव दिले.

रविवार ३ डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंती आहे. यादिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटानी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात  असतांना उगवेल. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल. त्यावेळी चंद्रबिंब नेहमींपेक्षा जास्त मोठे व तेजस्वी दिसेल. संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्व आकाशात सर्वाना साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेतां येईल. सुपरमूनचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांना ही एक पर्वणी असेल असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

यापूर्वी  १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते. आता यानंतर नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवार १ जानेवारी २०१८ रोजी पौष पौर्णिमेच्या रात्री ' सुपरमून ' आपणास दर्शन देणार आहे. त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार कि.मीटर अंतरावर येणार असल्याचेही  सोमण यांनी सांगितले. 

Web Title: Superman will appear on the Sunday night! Know the name of this superman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.