अंधश्रद्धेचा कहर ! स्वप्नात शिवलिंग पाहून त्याने खोदून टाकला हायवे

By admin | Published: June 7, 2017 12:35 PM2017-06-07T12:35:24+5:302017-06-07T12:39:00+5:30

धक्कादायक म्हणजे हे खोदकाम करण्यासाठी स्थानिकांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनी समर्थन दिलं होतं

Superstition woes! He dreamed of seeing Shivling in the highway | अंधश्रद्धेचा कहर ! स्वप्नात शिवलिंग पाहून त्याने खोदून टाकला हायवे

अंधश्रद्धेचा कहर ! स्वप्नात शिवलिंग पाहून त्याने खोदून टाकला हायवे

Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 7 - सोमवारी जेव्हा संपुर्ण देशाचं लक्ष GSLV मार्क -3 च्या प्रक्षेपणाकडे लागलं होतं, तेव्हा हैदराबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग 163 वर जमिनीखाली शिवलिंगचा शोध घेण्यासाठी खोदकाम सुरु होतं. खोदकाम करण्यासाठी जेएसबी मशीनही मागवण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे हे खोदकाम करण्यासाठी स्थानिकांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनी समर्थन दिलं होतं. बरं हा सगळा व्याप फक्त एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन सुरु होता ज्याने स्वप्नात याठिकाणी शिवलिंग पाहिल्याचा दावा केला होता. 
 
ही घटना हैदराबादपासून 80 किलोमीटर दूर असलेल्या तेलंगणामधील जनगावातील आहे. या खोदकामामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. हा हायवे वारंगलला हैदराबादशी जोडतो. याच महामार्गावर मधोमध आठ फूट खोल खड्डा खोदण्यात आला. 
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज नावाची ही व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी खोदकाम करण्यासाठी जोर देत होता. त्याने आपल्या स्वप्नात शिवलिंग पाहिलं होतं. जेव्हा कधी याठिकाणी तो यायचा तेव्हा जोरात हालचाल करायला आणि लोटांगण घालायला सुरुवात करायचा. 
सुरुवातीला मनोजने 10 फूट खोदण्यास सांगितलं, पण 15 फूट खोदूनही शिवलिंग सापडलं नाही. तेव्हा एका स्थानिक पोलीस कर्मचा-याला संशय आला आणि त्याने मनोजसह एका स्थानिक नेत्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी बेकायदेशीरपणे खोदकाम केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र एफआयरमध्ये कोणाचंही नाव नाही आहे. 
 

 

Web Title: Superstition woes! He dreamed of seeing Shivling in the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.