पुरवणी लेख....-आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........1
By admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:35+5:302017-03-23T17:18:35+5:30
लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.
Next
ल कसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.अर्थात असं नव्हतं की, अकोले विधानसभा मतदारसंघात वादळवारं नव्हते, उलट मला पराभूत करण्यासाठी विविध पातळीवरुन प्रयत्न केले जात होते. कोठे शत प्रतिशत, कोठे अब की बार, कोठे धनुष्यबाण, कोठे गद्दारी, कोठे बाह्य हस्तक्षेप अशा पध्दतीने माझ्या विरोधात विरोधक रान उठवित होते. टोकाचा विरोध करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत होते. माझा विजय निश्चित सोपा नव्हता. विरोधकांना पिचड घराण्याचा कायमस्वरुपी पराभव सतत दिसतो तर पिचड घराण्यांवर प्रेम करणार्या अठरा पगड जातीच्या, आदिवासी जमातीच्या माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, युवकांना, जेष्ठ नागरिकांना पिचड यांचा जय-विजयच दिसतो आणि हेच गमक आहे माजी मंत्री पिचड साहेबांच्या विचारात व कार्यप्रणालीत.समाज जीवनात आदरणीय साहेबांचा सक्रियतेचा काळ जवळपास अर्धशतकाचा असेल. पंचायत समितीचे सभापती, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इत्यादी वेळोवेळी मिळालेल्या पदांचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी, आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कासाठी, तालुक्यातील जनतेसाठी, तालुक्याच्या पाणी प्रश्नांसाठी शिक्षणासाठी, रस्ते व दळणवळण सुविधांसाठी, निळवंडे, आंबीत, पिंपळगाव खांड, सांगवी, बलठण, शिरपुंजे, कोथळे, पाडोशी आदि धरण शृंखलेच्या निर्मितीसाठी, प्रकल्पग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी, दुग्ध पंढरीसाठी, तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती कारखान्यासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवर आदिवासीचे संघटन व्हावे यासाठी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी, पाणीप्रश्नावरील तसेच शेतकर्यांच्या आंदोलनासाठी व उन्नतीसाठी, आदिवासी समाजात झालेल्या बोगस आदिवासींच्या घुसखोरींच्या विरोधासाठी, तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी, वीज प्रकल्पांची निर्मिती व तालुक्यात वीजवितरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी अशा विविध कामांसाठी त्यांनी केला.