मनपाला मोफत एलईडी बल्बचा पुरवठा
By Admin | Published: November 4, 2015 11:28 PM2015-11-04T23:28:19+5:302015-11-04T23:28:19+5:30
मनपा कार्यक्षेत्रात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर काही महिन्यानंतर या योजनेसाठी पुढाकार घेणार्या नगरपालिका आणि तिसर्या टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींना एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एलईडी बल्ब वाटपाची मोहिम ही मे-२०१६ मध्ये राबविण्यात येणार होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात या योजनेला सुरुवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
म पा कार्यक्षेत्रात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर काही महिन्यानंतर या योजनेसाठी पुढाकार घेणार्या नगरपालिका आणि तिसर्या टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींना एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एलईडी बल्ब वाटपाची मोहिम ही मे-२०१६ मध्ये राबविण्यात येणार होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात या योजनेला सुरुवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक पारधी यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाश योजनेचे स्वरुप, ग्राहकांना देण्यात येणारा लाभ आणि योजनेत सहभागी होण्याची पद्धती याबाबत माहिती दिली.चौकटीकाय आहे योजना?घरगुती कार्यक्षम प्रकाश योजना कार्यक्रम या अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यात १०० रुपयांचा नगदी भरणा केल्यानंतर सात वॅट क्षमतेचे ४ एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. हा बल्ब खराब झाल्यास तीन वर्षांपर्यंत रिप्लेसमेंट वॉरंटीसह मिळणार आहे. ग्राहकाकडे १०० रुपये नसल्यास त्यांनी दहा रुपये ॲडव्हॉन्स भरून नंतर उर्वरित रकमेचा १० सुलभ हप्त्यात भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.योजनेचा लाभ कसा मिळणारनगदी पैसे भरण्यासाठी वीज बिल व ओळखपत्राची झेरॉक्स, ॲडव्हॉन्स भरण्यासाठी वीज बिल, ओळखपत्र व निवासाचा पुरावा लागणार आहे. वीज बिलाची पूर्ण रक्कम भरलेली असणे गरजेचे आहे.एलईडी बल्बमुळे होणारे लाभएल.ई.डी.बल्बच्या वापरामुळे एकुण ७४९.८१ दशलक्ष युनिटची प्रत्येक वर्षात वीज बचत होणार आहे. त्यामुळे वीज खरेदीपोटी एकुण २५९.३१ कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. महाराष्ट्र नियामक आयोगाने दिलेल्या आराखड्यानुसार जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील सात लाख ६७ हजार ५८४ ग्राहकांना ३०.७१ लक्ष एलईडी बल्बचे वितरण करण्यात येणार आहे.