दोन टप्यात सर्व कपाशी बियाणे पुरवठा करा जि.प.त बैठक : बियाणे, खते वितरकांचा सहभाग
By admin | Published: May 13, 2016 10:35 PM2016-05-13T22:35:51+5:302016-05-13T22:35:51+5:30
जळगाव : या खरीप हंगामामध्ये कपाशीचे २१ लाख २० हजार पाकिटे कपाशीच्या बियाण्याचा पुरवठा होणार असून, हा पुरवठा दोन टप्प्यात संबंधित वितरक, कंपन्यांनी करावा, अशा सूचना कृषि अधिकार्यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत बियाणे वितरकांना दिल्या.
Next
ज गाव : या खरीप हंगामामध्ये कपाशीचे २१ लाख २० हजार पाकिटे कपाशीच्या बियाण्याचा पुरवठा होणार असून, हा पुरवठा दोन टप्प्यात संबंधित वितरक, कंपन्यांनी करावा, अशा सूचना कृषि अधिकार्यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत बियाणे वितरकांना दिल्या. शुक्रवारी दुपारी जि.प.तील कृषि विभागामध्ये ही बैठक झाली. कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, जिल्हा कृषि अधिकारी (प्रशासन) सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी प्रदीप ठाकरे, खत वितरक, बियाणे वितरक उपस्थित होते. पुरवठ्याची आकडेवारी घेतलीविविध कपाशी बियाणे पुरवठादार कंपन्या किती बियाणे पाकिटांचा पुरवठा करतील याची माहिती अधिकार्यांनी घेतली. त्यात राशी ६५९ची एक लाख ३३ हजार पाकिटे, अजित १५५ ची एक लाख ९४ हजार, जय बीटीची एक लाख, विठ्ठलची ७० हजार, ब्रााची एक लाख पाकिटे मिळतील, अशी माहिती देण्यात आली. या बियाण्याचा अर्धाअधिक पुरवठा पावसाळ्यापूर्वी आणि उर्वरित पुरवठा जून महिन्याच्या मध्यापर्यंत केला जावा, अशी सूचना देण्यात आली. अद्याप पुरवठा नाहीसध्या काही कंपन्यांच्या बियाण्याचा पुरवठा झाला, पण तो दाबून धरला आहे. बाजारात काळाबाजाराच्या अफवा सुरू असल्याचे अधिकार्यांनी वितरकांना विचारले, पण वितरकांनी अद्याप कपाशी बियाण्याचा पुरवठाच झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. या वेळी किसान पोर्टल, मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांसाठी सुरू केलेले किसान ॲप याबाबत चर्चा झाली. किसान पोर्टलच्या संकल्पनेची माहिती वितरकांना देण्यात आली.