अखिलेशच्या साथीने काँग्रेसच्या जागा दुपटीने वाढण्याचा अंदाज

By Admin | Published: February 20, 2017 01:22 AM2017-02-20T01:22:52+5:302017-02-20T01:22:52+5:30

‘दत्तक पुत्राची उत्तरप्रदेशला आवश्यकता नाही. विकासाच्या स्वप्नासाठी राज्याचे दोन सुपुत्र अखिलेश आणि राहुल यांची जोडी मनापासून झटते

With the support of Akhilesh, Congress's space is expected to increase twice | अखिलेशच्या साथीने काँग्रेसच्या जागा दुपटीने वाढण्याचा अंदाज

अखिलेशच्या साथीने काँग्रेसच्या जागा दुपटीने वाढण्याचा अंदाज

googlenewsNext

सुरेश भटेवरा / रायबरेली
‘दत्तक पुत्राची उत्तरप्रदेशला आवश्यकता नाही. विकासाच्या स्वप्नासाठी राज्याचे दोन सुपुत्र अखिलेश आणि राहुल यांची जोडी मनापासून झटते आहे. इथला प्रत्येक तरूण त्यासाठी समर्थ आहे. राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू व्हावे, अशी सर्वांनाच आशा आहे, मात्र बाहेरच्या दत्तक व्यक्तिची त्यासाठी या राज्याला गरज नाही’.
रायबरेली आणि महाराजगंज मतदारसंघात निवडक सभांमधे अशा त्रोटक शब्दात प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले. तथापि राज्यातल्या जनतेला गांधी घराण्याच्या या ‘बिटिया’कडून जी खास अपेक्षा होती, तसे काही घडले नाही. प्रियंका गांधींचा अपेक्षित आक्रमक अवतार अजून तरी या निवडणुकीत पहायला मिळालेला नाही.
काँग्रेसचे भाग्य यंदा एकतर अखिलेशच्या समाजवादी पक्षाला जोडलेले आहे. याखेरीज आपल्या आक्रमक आवेशाने राहुलचे नेतृत्व झाकोळून जाऊ नये, याची प्रियंका बहुदा दक्षता घेत असाव्यात. थोडक्यात सांगायचे तर काँग्रेसचे हे हुकुमाचे पान अद्याप पूर्णांशाने मैदानात उतरलेले नाही.
सोनिया गांधींचा मतदारसंघ रायबरेली, उत्तरप्रदेशात काँग्रेसचे परंपरागत बेट आहे. नेहरूंच्या कालखंडात फिरोज गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. इंदिरा गांधीचा १९७७ सालचा एकमेव पराभव वगळता सातत्याने इथे गांधी घराण्याचा सदस्यच लोकसभेवर निवडून आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र इथल्या विविध मतदारसंघात समाजवादी, बसप, काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांचे उमेदवार निवडून येतात.
रायबरेली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने यंदा अमेरिकेच्या ड्युक विद्यापीठात व्यवस्थापन क्षेत्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या २९ वर्षाच्या अदितीसिंगला उमेदवारी दिली आहे. अदितीची निवड स्वत: प्रियंका गांधींनी केली आहे. स्थानिक जनतेत लोकप्रिय असलेले रॉबीनहूड प्रतिमचे बाहुबली नेते अखिलेशसिंग हे अदितीचे पिता. उत्तरप्रदेश विधानसभेत तीनदा काँग्रेस, एकदा अपक्ष तर एकदा पीस पार्टीच्या तिकिटावर असे एकुण ५ वेळा अखिलेशसिंग रायबरेलीतून निवडून आले. सध्या ते कर्करोगाने आजारी असल्याने अंथरूणाला खिळून आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीशी अत्यंत मनमोकळेपणाने त्यांनी तासभर गप्पा मारल्या.
आसपासच्या मतदारसंघांवरही भाष्य केले. अखिलेशसिंगांचे दिवंगत पिता धुन्नीसिंग काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. अदितीला उमेदवारी देउन प्रियंकांनी राजकारणाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. रायबरेलीत अदिती मोठया फरकाने निवडून येतील, याविषयी त्यांच्या विरोधकांनाही शंका नाही.
रायबरेली व अमेथीत जगदिशपूर वगळता अन्य ९ मतदारसंघात मात्र काँग्रेसच्या उमेदवारांची प्रतिस्पर्ध्यांशी कडवी झुंज आहे.
राहुल गांधींचे खास सहकारी माजी केंद्रीय राज्यमंत्री जितिनप्रसाद, यांच्या तिलहर मतदारसंघात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शहाँजहांपूरचे काँग्रेसचे दिवंगत नेते जितेंद्र प्रसादांचे ते सुपुत्र आहेत. उत्तरप्रदेशात समाजवादी आणि काँग्रेसची आघाडी सत्तेवर  ली तर जितिनप्रसाद हमखास उपमुख्यमंत्री होतील, असा इथल्या जनतेला विश्वास आहे. प्रत्यक्षात असे घडले तर तब्बल २७ वर्षानंतर राज्याच्या सत्तेत काँग्रेसचे पुनरागमन होईल.

Web Title: With the support of Akhilesh, Congress's space is expected to increase twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.