जातीय समिकरणांचा आधार सर्व पक्षात धर्मनिरपक्षतेचा प्रचार : बेरजेच्या राजकारणावर उमेदवारांचा भर

By admin | Published: February 15, 2017 09:06 PM2017-02-15T21:06:37+5:302017-02-15T21:06:37+5:30

जातीय समिकरणांचा आधार सर्व पक्षात धर्मनिरपक्षतेचा प्रचार : बेरजेच्या राजकारणावर उमेदवारांचा भर

The support of caste communities is the promotion of secularism in all parties: the emphasis of candidates on the politics of pledge | जातीय समिकरणांचा आधार सर्व पक्षात धर्मनिरपक्षतेचा प्रचार : बेरजेच्या राजकारणावर उमेदवारांचा भर

जातीय समिकरणांचा आधार सर्व पक्षात धर्मनिरपक्षतेचा प्रचार : बेरजेच्या राजकारणावर उमेदवारांचा भर

Next

अमरावती : जिल्ह्यात ५९ गट व ८८ गणांच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये अलीकडेच जाती, धर्माचे वातावरण प्रभावी ठरत आहे. धर्मनिरपेक्ष म्हणून डांगोऱ्या पिटणाऱ्या उमेदवारांकडून जातीय समिकरणांचा आधार घेतल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
बेरजेचे राजकारण करताना नवनवीन क्लुप्त्या राजकीय पक्ष व उमेदवारांद्वारा आखल्या जातात. कुठल्या गावात, कुठल्या भागात जातीय समिकरणांचा प्रभाव आहे, याचा आढावा घेऊन समिकरणे आखल्या जात आहेत. ‘हिंदुत्ववादी व्होट बँक’ काबीज करण्याचा प्रयत्न भाजप व शिवसेनेद्वारा केल्या जात आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्ष व संघटना बहुजन समाज, दलित-मुस्लिम, आदिवासी आदी समाजाची गठ्ठा मते कशी मिळविता येतील, याचे नियोजन करीत आहे. यामध्ये आता ‘मराठा समाजाला’ आरक्षण या नवीन मुद्द्याची भर पडली आहे. यासाठी सर्वच पक्षाद्वारा विशेष बैठका होत आहेत. आपल्या पक्षाच्या व्होट बँकेला कुठेही खिंडार पडू नये, याची देखील दक्षता घेतली जात आहे.
महायुती व आघाडी यांच्यात ताटातूट झाल्यानंतर मतांमध्ये विभागणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना मताधिक्य मात्र कमी राहणार आहे. पक्षीय मतदारांसोबतच जात, धर्माच्या नावावर डाव खेळून ‘सेफ झोन’ मध्ये राहण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करीत आहे. समाजातील नेत्यांना पुढे करून अधिकाधिक मते खेचण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येतो.

आशीर्वादासाठी सर्व काही
अलिकडच्या निवडणुकांमध्ये धार्मिक संस्थाचा वावर वाढला आहे. त्या धर्माच्या संत, महंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांचा आटापीटा सुरू आहे. धार्मिक संस्थांना भेटी देणे, संवाद साधने यावर भर दिल्या जात आहे. प्रसंगी पक्षाच्या मोठ्या नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रकार देखील होताना दिसत आहे.


जातीय संघटनेच्या पुढाऱ्यांना कमालीचे महत्व
सर्व जाती, धर्माची मते मिळावीत, याकडे उमेदवारांचा कल दिसून येतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणेच या निवडणुकीत जातीय संघटनेच्या पुढाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. यामध्ये काहींनी खुलेआम तर काहींनी सावध भूमिका घेतली आहे.

Web Title: The support of caste communities is the promotion of secularism in all parties: the emphasis of candidates on the politics of pledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.