ख्रिसमस सेलिब्रेशनऐवजी करणार चेन्नई पूरग्रस्तांना मदत - चर्च ऑफ साऊथ इंडियाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2015 10:16 AM2015-12-11T10:16:59+5:302015-12-11T10:51:58+5:30

चेन्नईतील पूराच्या पार्श्वभूमीवर चर्च ऑफ साऊथ इंडिया' या ख्रिस्ती संघटनेने ख्रिसमसचे सेलिब्रेशन रद्द करून चेन्नईतील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Support for Chennai flood victims, instead of Christmas Celebration - Church of South India decision | ख्रिसमस सेलिब्रेशनऐवजी करणार चेन्नई पूरग्रस्तांना मदत - चर्च ऑफ साऊथ इंडियाचा निर्णय

ख्रिसमस सेलिब्रेशनऐवजी करणार चेन्नई पूरग्रस्तांना मदत - चर्च ऑफ साऊथ इंडियाचा निर्णय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. ११ - शतकातील सर्वात भयंकर पाऊस व पुरामुळे तामिळनाडूसह चेन्नईतील जीवन उद्ध्वस्त झालेले असून पाणी ओसरले तरी पुरामुले शहराचे अपरिमित नुकसान झाले आहे. चारही बाजूंनी मदतीचा ओघ येत असला तरी चेन्नईला असून मोठ्या आर्थिक व मानसिक आधाराची गरज आहे. हे ओळखूनच 'चर्च ऑफ साऊथ इंडिया' या ख्रिस्ती संघटनेने ख्रिसमसचे सेलिब्रेशन रद्द करून चेन्नईतील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
'या वर्षी ख्रिसमस साजरा न करण्याचा निर्णय चर्चने घेतला आहे, असे इमॅन्युअल देवाकाडाचियम यांनी सांगितले. ख्रिसमस सेलिब्रेट करण्याऐवजी आम्ही तो वेळ आणि ती शक्ती पूरग्रस्तांची मदत व पुनवर्सनासाठी वापरू, असे ते म्हणाले. यासाठी चर्चतर्फे एक निवेदनही काढण्यात आले आहे. 

Web Title: Support for Chennai flood victims, instead of Christmas Celebration - Church of South India decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.