कन्हैया अटकेचे दिल्ली पोलिसांकडून समर्थन

By Admin | Published: February 17, 2016 02:00 AM2016-02-17T02:00:24+5:302016-02-17T02:00:24+5:30

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी पुरावा असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जेएनयू उच्चाधिकार समितीने देशद्रोही प्रकरणात कन्हैया कुमार दोषी असल्याचा निर्वाळा दिला आहे.

Support from Delhi Police in Kanhaiya | कन्हैया अटकेचे दिल्ली पोलिसांकडून समर्थन

कन्हैया अटकेचे दिल्ली पोलिसांकडून समर्थन

googlenewsNext
ी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी पुरावा असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जेएनयू उच्चाधिकार समितीने देशद्रोही प्रकरणात कन्हैया कुमार दोषी असल्याचा निर्वाळा दिला आहे.



चौकशीत त्याने भाषण केल्याचे कबूल केले आहे. या घटनेत सामील असलेल्यांना हुडकून त्यांनाही लवकर अटक केली जाईल, असेही बस्सी यांनी सांगितले. दोषींची गय केली जाणार नाही. दिल्ली पोलीस कायद्यानुसार कारवाई करीत असून जेएनयू प्रशासनाकडूनही पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
२६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने केलेले टिष्ट्वट खरे, की बनावट याच्याशी पोलिसांना काहीही देणेघेणे नाही. हाफिजचा टिष्ट्वट बनावट असल्याचा तरी कुठे पुरावा आहे. भारतातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू पाहणार्‍यांपासून भारतीयांनी सावध राहणे महत्त्वाचे आहे, असेही बस्सी म्हणाले. त्या टिष्ट्वटचा आशय अत्यंत आक्षेपार्ह होता.
जेएनयू आणि पटियाला कोर्टातील घटना दोन वेगवेगळ्या घटना आहेत. जेएनयूमध्ये देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या, तर पटियाला कोर्टातील बाहेरील झटापट वेगळ्या स्वरूपाची होती. या दोन्ही घटनांची तुलना करणे शक्य नाही. गृहमंत्रालयाच्या इशार्‍यानुसार दिल्ली पोलिसांनी कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही बस्सी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Support from Delhi Police in Kanhaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.