तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

By admin | Published: July 6, 2017 01:42 PM2017-07-06T13:42:48+5:302017-07-06T13:50:56+5:30

जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे

But support Sikkim's independence - China's apparent threat | तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

Next
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. चिनी सरकारच्या मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये हिमालयामधील देशांना भारताने आपल्या मागे ओढू नये असा सूर उमटला आहे. संपादकीयामध्ये भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा देईल असे म्हटले आहे.
भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. चीनमधील सरकारी मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेला सूर हा चिनी सरकारची अधिकृत भूमिका मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा हास्यास्पद दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला संपादकीयात देण्यात आला आहे.
भारत तिबेट व दलाई लामांचा विषय काढेल हे गृहीत धरून चिनी प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेकवेळा काढून झालेला आहे आणि आता त्यात नवीन भर टाकण्यासारखे काही नसल्याचा दावाही केला आहे. जर चीनने भारताशी असलेल्या संबंधांचा पुनर्विचार केला तर भारताला ते महागात जाईल अशी धमकी पुन्हा एकदा चीनने दिली आहे. 
काही दिवसांपूर्वी 1962 च्या युद्धाचा दाखला देत भारताने इतिहासापासून बोध घ्यावा अशी धमकी चीनने दिली होती.
 
आणखी वाचा
 
डोंगलांगमधून लष्कर न हटवल्यास हुसकावून लावू, चीनची भारताला धमकी
चीनला इशारा - भारत, अमेरिका व जपानच्या युद्धनौकांचा संयुक्त सराव
नेहरूंनी सिक्कीम सीमेसंदर्भात चीनशी केला नव्हता कोणताही करार
 
भारतामध्ये प्रवास करणाऱ्या चिनी प्रवाशांना ट्रॅव्हेल अॅलर्ट देण्याचा विचार करत असल्याचेही चीनने म्हटले आहे. 1890 मध्ये इंग्लंड व चीनमध्ये झालेल्या कराराचा भारत भंग करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 
चीन सिक्कीम सीमेवरील डोंगलाँग या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता बांधत असून भारताने याला आक्षेप घेतला. या रस्त्यामुळे अतिपूर्वेकडील राज्यांमध्ये असणारी दळणवळण यंत्रणेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती भारताने व्यक्त केली. तर, चीनच्या दाव्यानुसार हा रस्ता चीन आपल्या अधिकारात असलेल्या भागात बांधत आहे. जर, सिक्कीम, भूतान व भारत या भौगोलिक तिठ्याजवळ चीनची दळणवळण व्यवस्था पोचली तर लष्करीदृष्ट्या चीन भारताच्या वरचढ ठरेल अशी भीती आहे. कारण या भागापासून चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा प्रांत जो अतिपूर्वेकडील राज्यांना उर्वरीत भारताशी जोडतो तो अत्यंत जवळ आहे. ही केवळ 27 किलोमीटर रुंदीची पट्टी असून ती जर युद्धाच्या फुफाट्यात सापडली तर अतिपूर्वेकडील राज्यांचा उर्वरीत भारताशी संपर्क पूर्णपणे बंद होईल.
या पार्श्वभूमीवर चीन व भारतातील सध्याची संघर्षमय स्थिती महत्त्वाची असून त्यात रोज प्रतिकूल घटनांची भर पडत आहे.

Web Title: But support Sikkim's independence - China's apparent threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.