स्मार्टफोनधारकांच्या फोनबुकमध्ये घुसला आधारचा हेल्पलाइन नंबर; सोशल मीडियात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 05:25 AM2018-08-04T05:25:57+5:302018-08-04T05:25:57+5:30
लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन नंबर अचानक आल्याने लोकांना धक्काच बसला.
नवी दिल्ली : लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन नंबर अचानक आल्याने लोकांना धक्काच बसला.
युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (यूआयएडीआय) यावर खुलासा करताना स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीला हेल्पलाइन नंबर युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फीड करण्यास सांगितले नाही. त्यामुळे हा हेल्पलाइन नंबर कसा काय आला, याची सोशल मीडियावर चर्चा आहे. फोनबुकमध्ये जो नंबर सेव्ह झाला, तो १८००-३००-१९४७ असा आहे. हा हेल्पलाइन नंबर जुना असल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले. नवा टोल फ्री-नंबर १९४७ हा आहे.
अनेक सवाल
फ्रेंच सुरक्षा तज्ज्ञ एलियट एल्डरसन यांनी टिष्ट्वट करून सवाल केला की, वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांच्या काही युजर्सच्या फोनमध्ये त्यांना माहीत नसताना आधार नंबर सेव्ह कसा काय झाला?