Suprem Court on Husband Property: मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:29 AM2022-02-02T09:29:01+5:302022-02-02T09:29:25+5:30

Suprem Court on Property will: न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याचबरोबर पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.

Suprem Court on Husband Property: What is wife's right over husband's property through will? An important decision of the Supreme Court | Suprem Court on Husband Property: मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

Suprem Court on Husband Property: मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती? सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

Next

नवी दिल्ली : पत्नीचा पतीच्या संपत्तीवर किती हक्क असतो, यावर सर्वोच्च न्यायालयाने एका ५० वर्षे जुन्या खटल्यावर महत्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, स्वत: कमाविलेल्या संपत्तीचा मालक जर हिंदू पुरुष असेल आणि जर त्याने मृत्यूपत्राद्वारे ती संपत्ती पत्नीला दिली असेल तर ती त्या संपत्तीचा पूर्ण मालक होत नाही. हे पतीने पत्नीचा मृत्यू पश्चात खर्च भागण्यासाठी योग्य तरतूद केली तर पत्नीचा मृत्यूपत्राद्वारे दिलेल्या संपत्तीवर पूर्ण हक्क राहत नाही, असे म्हटले आहे. 

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याचबरोबर पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. हरियाणाच्या जुंडला गावचे रहिवासी असलेले तुलसी राम यांनी १५ एप्रिल १९६८ ला मृत्यूपत्र केले होते. पुढील वर्षी १७ नोव्हेंबर १९६९ ला त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपत्रात त्यांनी त्यांची अचल संपत्ती दोन भागात वाटली होती. एक भाग पहिल्या पत्नीचा मुलगा आणि दुसरा भाग दुसऱ्या पत्नीच्या नावे केला होता. 

या वाटणीमध्ये देखील दुजाभाव होता. तुलसी राम यांनी मुलाच्या नावे निम्मी संपत्ती पूर्ण मालकी हक्काने दिली होती. परंतू पत्नीला तिचे भरण पोषण होईल एवढी आणि या उद्देशाने सीमित संपत्ती दिली होती. तसेच दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर या संपत्तीवर मुलाचा हक्क येईल असेही म्हटले होते. राम देवीने ही संपत्ती विकली होती, यावर मुलाने दावा दाखल केला होता. न्यायालयाने सांगितले की, या कारणामुळे राम देवीकडून संपत्ती विकत घेणाऱ्यांचा या संपत्तीवर कोणताही हक्क उरत नाही. त्यांच्या बाजुने खरेदीखत कायम केले जाऊ शकत नाही. राम देवीला सीमित मृत्यूपत्राद्वारे मिळालेली संपत्ती विकण्याचा हक्क नव्हता, किंवा ती दुसऱ्याच्या नावे हस्तांतर करू शकत नव्हती. 
 

Web Title: Suprem Court on Husband Property: What is wife's right over husband's property through will? An important decision of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.