अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं प्रकरण, सुप्रीम कोर्टानं सुब्रमण्यम स्वामींची याचिका स्वीकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 01:15 PM2016-04-05T13:15:58+5:302016-04-05T13:15:58+5:30
सुप्रीम कोर्टानं भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या प्रकरणाची याचिका स्वीकारली आहे.
Next
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५- सुप्रीम कोर्टानं भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या प्रकरणाची याचिका स्वीकारली आहे. सुब्रमण्यम स्वामींना सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडे या प्रकरणात जलद सुनावणीची मागणी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
कोर्टानं या प्रकरणात मुख्य याचिकाकर्ता मोहम्मद हाशीम यांची याचिका फेटाळली आहे. हाशीम यांनी याचिकेत सुब्रमण्यम स्वामींची याचिका न स्वीकारण्याची विनंती केली होती. स्वामींच्या मूलभूत सुविधा देण्याच्या मुद्द्याचाही या याचिकेत समावेश करण्यात आला आहे आता या प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होणार आहे.
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी याचिकेत दर्शन घेणा-या भाविकांसाठी पाणी, शौचालय, पार्किंगसारखी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.