सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित
By admin | Published: April 22, 2016 04:52 PM2016-04-22T16:52:18+5:302016-04-22T17:19:22+5:30
उत्तराखंड उच्च न्यायालयानं उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- उत्तराखंड उच्च न्यायालयानं उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीला स्थगिती दिली होती. त्याविरोधात केंद्र सरकारनं आज सर्वोच न्यायालयात अपील केलं होतं. त्यावर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हरिश रावत यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयानं राष्ट्रपती राजवट हटवण्यासंदर्भात याचिका केली होती. त्यावर उत्तराखंड उच्च न्यायालयानं राष्ट्रपती राजवट हटवलीही होती. 9 आमदार फुटल्यानं हरिश रावत सरकार अल्पमतात आलं होतं. काँग्रेसच्या हरिश रावत यांना उत्तराखंड उच्च न्यायालयानं बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं होतं आणि केंद्र सरकारलाही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात फटकारलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या निर्णयालाच स्थगिती दिली आहे.