निवडणुकीत होतोय काळ्या पैशाचा वापर, अटर्नी जनरलची सर्वोच्च न्यायालयात कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:57 PM2019-04-11T18:57:53+5:302019-04-11T18:58:17+5:30

निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत.

Supreme Court admits the use of black money in elections | निवडणुकीत होतोय काळ्या पैशाचा वापर, अटर्नी जनरलची सर्वोच्च न्यायालयात कबुली

निवडणुकीत होतोय काळ्या पैशाचा वापर, अटर्नी जनरलची सर्वोच्च न्यायालयात कबुली

Next

नवी दिल्ली- निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होत आहे, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावरच्या सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल म्हणाले, निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो यात तथ्य आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेकायदेशीर पद्धती वापरल्या जातात. यात काहीही नवीन नाही.

आधीपासूनच हे होत आलं आहे. राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टरनं दौरे करतात, ज्यावर भरमसाट पैसा खर्च होतो. एवढा पैसा कुठून येतो. तो काळा पैसाच असतो, अशी कबुली खुद्द अटर्नी जनरलनं दिली आहे. केंद्र सरकारनं काळा पैसा संपवण्यासाठी इलेक्टोरल बाँड संकल्पना आणली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्याच्या पीठानं इलेक्टोरोल बाँडसंदर्भातील याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयानं निवडणूक संपेपर्यंत इलेक्टोरल बाँडवर बंदी आणली आहे. 

लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. अबकारी खाते, पोलीस खाते यांच्या सहकार्याने आयकर खातेही आता सज्ज झाले आहे. या काळामध्ये बॅँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती बॅँकांनी निवडणूक आयोगाला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तसेच मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीवरही आयकर खात्याची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विमानतळांवरही पथके करणार तैनात
विभागातील सर्व विमानतळांवरही आयकर विभागाची नजर राहणार असून, प्रत्येक विमानतळावर पथके तैनात केली जाणार आहेत.  विमानतळांवर नियमितपणे विमानांचे आगमन-निर्गमन होते तेथे तसेच अन्य ठिकाणीही विमाने तसेच हेलिकॉप्टरने येणारे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांचीही तपासणी होऊ शकते.

Web Title: Supreme Court admits the use of black money in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.