Supreme Court: डॉक्टरी सेवेविरोधात ग्राहक म्हणून दाद मागता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:52 PM2022-04-29T21:52:07+5:302022-04-29T21:52:52+5:30

Healthcare Service in consumer Protection Act: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करणाऱ्या मेडिको लीगल अॅक्शन ग्रुप संस्थेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

Supreme Court: appeal against medical services as a consumer Protection Act; Big decision of the Supreme Court on Healthcare services | Supreme Court: डॉक्टरी सेवेविरोधात ग्राहक म्हणून दाद मागता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court: डॉक्टरी सेवेविरोधात ग्राहक म्हणून दाद मागता येणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Next

सर्वोच्च न्यायालयाने आज एक खूप मोठा निर्णय दिला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. डॉक्टरांकडून देण्यात येणारी वैद्यकीय सेवा ही 'कंझ्यूमर प्रोटेक्शन एक्ट' (Consumer Protection Act) मध्ये येते असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. याचाच अर्थ रुग्ण त्याला योग्य सेवा मिळाली नाही तर त्या डॉक्टरविरोधात ग्राहक म्हणून तक्रार दाखल करू शकणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मेडिको लीगल अॅक्शन ग्रुपने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकत नाही, असे म्हणत या आदेशाला आव्हान दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करणाऱ्या मेडिको लीगल अॅक्शन ग्रुप संस्थेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा 1986 चा कायदा रद्द करून बनवण्यात आला आहे. केवळ कायदा रद्द करून आणि नवीन कायदा करून डॉक्टरांनी दिलेली आरोग्य सेवा सेवेच्या व्याख्याबाहेर काढता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आरोग्य सेवा कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवायची असेल तर संसदेने केलेल्या कायद्यात याचा उल्लेख करणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केवळ जुना कायदा रद्द करून त्याच्या जागी 2019 मध्ये नवीन कायदा आणल्यास डॉक्टरांची सेवा कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळून लावला होता आणि डॉक्टरांद्वारे प्रदान केलेल्या आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कक्षेत असल्याचे सांगितले होते. याविरोधात डॉक्टरांची संघटना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. 

Web Title: Supreme Court: appeal against medical services as a consumer Protection Act; Big decision of the Supreme Court on Healthcare services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.