मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठीचे बचावकार्य अपुरे, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:11 PM2019-01-03T14:11:23+5:302019-01-03T14:57:24+5:30
गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
नवी दिलेली - गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोळशाच्या खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्यासाठी उचलण्यात आलेली पाऊले अपुरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारला सांगितले आहे. मेघालयमधील कोळशाच्या खाणींमध्ये हे 15 मजूर गेल्या 13 डिसेंबरपासून अडकून पडले आहेत.
खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अद्याप यश का आलेले नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीक यांच्या खंडपीठाने मेघालय सरकारकडे केली आहे. यादरम्यान, न्यायालयात हजर असलेल्या वकिलांनी खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात असून, केंद्र सरकारकडूनही मदत मिळत आहे, असे न्यायालयाला सांगितले. मात्र सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आम्ही संतुष्ट नाही. इथे खाणीत अडकलेल्या 15 मजुरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. असे न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या वकिलांना सुनावले. तसेच या प्रकरणी योग्य ते आदेश देता यावेत यासाठी केंद्राच्या अॅटर्नी जनरलनाही न्यायालयात बोलावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
#Meghalayaminers: Supreme Court asks Meghalaya govt what steps the state government has taken to rescue 15 miners, who are trapped in an illegal flooded coal mine in East Jaintia Hills since December 13 last year. pic.twitter.com/PFX908Pa6C
— ANI (@ANI) January 3, 2019
मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी करणारी याचिका आदित्य एन. प्रसाद यांनी दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर न्यायालयात आजही सुनावणी सुरू राहणार आहे. मेघालयच्या पूर्वेला असलेल्या जैतीया पर्वतामध्ये असलेल्या एका खाणीत लितेन नदीचे पाणी भरल्याने खाणीत काम करणारे 15 मजूर आत अडकले होते.
#Meghalayaminers: Meghalaya govt submits before SC, "the state is taking steps to rescue the trapped miners. 72 NDRF personnel, 14 Navy personnel&Coal India personnel are working since Dec 14.". SC asks, “Then, why are they not successful?”, asks SC.
— ANI (@ANI) January 3, 2019