१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 12:57 PM2024-01-02T12:57:18+5:302024-01-02T13:03:00+5:30

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: श्रीरामजन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी नेमके काय झाले, याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केले.

supreme court cji dy chandrachud reaction over ayodhya ram mandir janmabhoomi controversy verdict | १३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. श्रीराम दर्शनाची आस देशवासीयांना लागली आहे. यातच राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिर निकालावर पाच सदस्यीय खंडपीठाचे एकमत कसे झाले, यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात चर्चेत असलेल्या जुन्या श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय दिला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करून ट्रस्टकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारांना मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी ५ एकर जमीन देण्यास सांगितले. याबाबत एका मुलाखतीत बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सविस्तर भाष्य केले.

५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले?

साधारणतः जुन्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने, या खटल्याला विविध  दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे. खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अयोध्या जमीन खटल्याच्या निकालाचा अंतिम परिणामच नव्हे, तर हा निकाल देण्याच्या कारणांमध्येही सर्वजण एकत्र असल्याचा स्पष्ट संदेश देण्यासाठी एकमुखी निकाल देण्याचे  सर्व न्यायाधीशांनी एकमताने निश्चित केले. या खटल्यास वादाची प्रदीर्घ पार्श्वभूमी होती आणि दोन्ही बाजूंना देशाच्या इतिहासाशी संबंधित टोकाची मते होती. अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी या निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता. कारण यामुळे हा निकाल कोणी लिहिला, त्या न्यायमूर्तींचे नाव समजणारच नाही, असे सीजेआय चंद्रचूड यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिर जन्मभूमीचा वादाची न्यायालयीन लढाई १३४ वर्षांपासून सुरू होती, असे सांगितले जाते. अयोध्या खटल्याचा निकाल देण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ तयार करण्यात आले होते. त्यात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर आणि विद्यमान सरन्याधीश धनंजय चंद्रचूड होते. 
 

Web Title: supreme court cji dy chandrachud reaction over ayodhya ram mandir janmabhoomi controversy verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.