याकूबच्या फाशीविरोधात सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

By admin | Published: August 2, 2015 11:45 AM2015-08-02T11:45:36+5:302015-08-02T11:45:45+5:30

याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे.

Supreme Court deputy registrar resigns over Yakub's death | याकूबच्या फाशीविरोधात सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

याकूबच्या फाशीविरोधात सुप्रीम कोर्टाच्या डेप्यूटी रजिस्ट्रार यांचा राजीनामा

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - याकूब मेमनच्या फाशीवरुन सुरु असलेला वाद अद्यापही सुरु असून सुप्रीम कोर्टाचे डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सुरेंद्रनाथ यांचा राजीनामा स्वीकारल असून यापुढे फाशीची शिक्षा रद्द व्हावी असे सुरेंद्रनाथ यांनी सांगितले आहे. 
याकूब मेमनला ३० जुलैरौजी फाशी देण्यात आली असून फाशीचे पडसाद आता सुप्रीम कोर्टातही उमटले आहेत. याकूबच्या फाशीचा निर्णय अत्यंत घाईने घेण्यात आला असून यामुळे व्यवस्थेवर एक डाग उमटल्याची खंत व्यक्त करत डेप्यूटी रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी त्यांच्या पदावरुन राजीनामा दिला. सुरेंद्रनाथ हे दिल्लीतील लॉ युनिव्हर्सिटीशी संबंधीत असून याकूबला फाशी होऊ नये यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात त्यांचे सक्रीय सहभाग होता. डेथ पेनल्टी रिसर्च प्रोजेक्टचे ते संचालक आहेत. राजीनाम्याचे नेमके कारण काय यावर त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. 

Web Title: Supreme Court deputy registrar resigns over Yakub's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.