सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:37 AM2018-11-10T07:37:03+5:302018-11-10T07:37:22+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला.

 Supreme Court directs on dhaba: Police foil the action; Only 300 cases filed in the state | सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

googlenewsNext

दिल्ली/मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेशिवाय फटाके फोडल्याबद्दल राज्यात केवळ ३०० जणांवर गुन्हे दाखल झाले असून मुंबईत आठ जणांना अटक झाली आहे.
दिवाळीत रात्री आठ ते दहा या कालावधीतच फटाके फोडण्याचे बंधन न्यायालयाने घातले होते. मात्र या आदेशाचे देशातील अनेक भागांत सर्रास उल्लंघन झाले. तरीदेखील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने हा आदेश म्हणजे चांगली सुरुवात आहे, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तांनी पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके उडविणाºयांवर कारवाईचे निर्देश देताच ठाणेदारांनी १३६ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले. नागपुरात ६४ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर मुंबई-ठाण्यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. तसेच बेकायदा फटाके विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापुरात विनापरवाना फटाके विक्री केल्याबद्दल १३ विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मात्र फटाके वाजवल्याबद्दल कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात एकही गुन्हा नोंद झालेला नाही. अकोला पोलिसांनी मात्र एकही गुन्हा दाखल न करता वरिष्ठ स्तरावरून परिपत्रक न आल्याचे सांगून कारवाईस टाळाटाळ केली.
पुणे पोलिसांच्या नियत्रंण
कक्षाकडे व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर ३५
तक्रारी आल्या आहेत. मात्र एकावरही कारवाई झाली नाही. येरवड्यात
फटाके वाजविणाºयांनी पोलिसांनाच मारहाण केली.

उत्पादनावरही होणार परिणाम

फटाक्यांमुळे होणाºया प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा देणारे अ‍ॅड. गोपाल शंकरनारायणन म्हणाले, न्यायालयाचा आदेश दिल्लीत नीट पाळण्यात आला नाही याला या शहरातील पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे भविष्यात फटाक्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे होणाºया प्रदूषणात नक्कीच घट झालेली असेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title:  Supreme Court directs on dhaba: Police foil the action; Only 300 cases filed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.