Nirbhaya Case: दोषींच्या वकिलांची अखेरची 'सर्वोच्च' चालही निष्फळ, चारही गुन्हेगार फासावर लटकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 03:46 AM2020-03-20T03:46:38+5:302020-03-20T03:59:51+5:30
आता नियोजित वेळेप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी वाचवण्यासाठी दोषींच्या वकिलांनी अखेरच्या क्षणापर्यंत खेळलेले डावपेच अखेर निष्फळ ठरले आहेत. रात्री तीनच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी दोषींचे वकील एपी सिंह यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले. तसेच आरोपींचे त्यामुळे आता नियोजित वेळेप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटवण्यात येणार आहे.
2012 Delhi gang-rape case: Supreme Court dismisses the petition of death row convict Pawan Gupta against rejection of his mercy plea by the President and seeking stay on execution. pic.twitter.com/kBfu8tKe9F
— ANI (@ANI) March 19, 2020
दोषींना होणाऱ्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजणावणीस स्थगिती मिळावी यासाठी वकील एपी सिंह यांनी प्रतंबित याचिकांचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला होता. मात्र उच्च न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद फेटाळून लावत शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.
त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे त्यांनी दोषी पवन गुप्ताच्यावतीने राष्ट्रपतींनी दया याचिकेवर दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. सर्व तांत्रिक मुद्द्यांची पूर्तता झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस सुरुवात झाली. तिथे न्यायमूर्ती एस भानुमती यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. तिथे ए. पी. सिंह यांचे सर्व युक्तिवाद न्यायमूर्तींनी फेटाळून लावले आणि दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर निर्भयाच्या आईने समाधान व्यक्त केले. माझ्या मुलीला शेवटी न्याय मिळाला आहे. तसेच आजचा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: I am feeling satisfied today because finally our daughter got justice. Whole country was ashamed of this crime, today the nation got justice. https://t.co/M9SCRHSkTxpic.twitter.com/7KPvazTcLu
— ANI (@ANI) March 19, 2020