...म्हणून महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:06 PM2020-01-17T12:06:22+5:302020-01-17T12:07:34+5:30
महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावली.
नवी दिल्लीः महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता ती याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडेंनी फेटाळून लावली. या याचिकेत महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळत महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून मोठी आहे, असं स्पष्ट केलं.
यासंदर्भात केंद्र सरकारला आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना याबाबत केंद्र सरकारला विचारणा करण्याचा सल्ला दिला आहे. महात्मा गांधींना कोणत्याही औपचारिक मान्यतेची गरज नसून ते देशाचे राष्ट्रपिता आहेत.
Supreme Court refuses to issue any order or directive to the Union of India for conferring Bharat Ratna on Mahatma Gandhi. pic.twitter.com/1uRYuDl6Jq
— ANI (@ANI) January 17, 2020
महात्मा गांधींची उंची या सगळ्याहून खूप मोठी आहे. जनता त्यांना सन्मानाच्या नजरेनं पाहते. महात्मा गांधींना भारतरत्न देण्यासाठी यापूर्वीसुद्धा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. महात्मा गांधींना भारतरत्न देणं म्हणजे त्यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी अशा याचिका फेटाळून लावल्या आहेत.
Supreme Court, while declining to pass any order in the PIL, said that Mahatma Gandhi is much higher than Bharat Ratna. https://t.co/0Fs4nY9DPk
— ANI (@ANI) January 17, 2020
आणखी बातम्या..
''सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट''
निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका गृहमंत्रालयाने पाठविली राष्ट्रपतींकडे
संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे