लैंगिक संबंधांना नकार दिल्यास घटस्फोटासाठी पात्र - सुप्रीम कोर्ट

By admin | Published: September 24, 2014 10:31 AM2014-09-24T10:31:48+5:302014-09-24T10:34:16+5:30

साथीदाराने लैंगिक संबंधांना दिर्घ काळापर्यंत नकार देणे ही मानसिक विकृती असून याआधारे घटस्फोट दिला जाऊ शकतो असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

The Supreme Court - eligible for divorce if he refuses sex | लैंगिक संबंधांना नकार दिल्यास घटस्फोटासाठी पात्र - सुप्रीम कोर्ट

लैंगिक संबंधांना नकार दिल्यास घटस्फोटासाठी पात्र - सुप्रीम कोर्ट

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ -  साथीदाराने लैंगिक संबंधांना दिर्घ काळापर्यंत नकार देणे ही मानसिक विकृती असून याआधारे घटस्फोट दिला जाऊ शकतो असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सध्या परदेशात राहणा-या एका तरुणाच्या याचिकेवर कोर्टाने हे मत नोंदवले आहे. 
सध्या कामानिमित्त परदेशात असलेल्या भारतीय तरुणाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले.  या तरुणाने पत्नीशी घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला होता. लग्नानंतर पत्नीने अनेकदा शारीरिक संबध ठेवण्यास नकार दिला होता असे त्या तरुणाचे म्हणणे होते. तर त्याच्या पत्नीने गर्भधारणेच्या भितीने संबंध ठेवण्यास नकार दिला असा युक्तिवाद कोर्टासमोर केला होता. मद्रास कोर्टानेही तरुणाच्या पत्नीचा युक्तिवाद अमान्य करत घटस्फोटाला परवानगी दिली होती. यानिर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. 
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी यावर निकाल दिला. लग्नानंतर दिर्घ काळापर्यंत पत्नीने शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक विकृती असून हे कारण घटस्फोटासाठी पात्र ठरु शकते असे सुप्रीम कोर्टाने नमुद केले. कोर्टाने घटस्फोटाला परवानगी देताना संबंधीत तरुणाने त्याच्या पत्नीला ४० लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Web Title: The Supreme Court - eligible for divorce if he refuses sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.