ममता बॅनर्जींचे वादग्रस्त छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:42 PM2019-05-14T12:42:50+5:302019-05-14T12:43:25+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्य ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त छायाचित्र प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आलेल्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना प्रियंका शर्मा यांनी या प्रकरणी लेखी माफी मागावी, अशी अट ठेवली. नंतर त्यांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. मात्र निकाल सुनावल्यानंतर न्यायमूर्तींनी प्रियंका शर्मा यांच्या वकिलांना बोलावून सशर्त जामिनाची अट रद्द केली, तसेच प्रियंका शर्मा यांना तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.
#UPDATE Supreme Court calls back Sharma's lawyer NK Kaul and modifies it's order and waives off condition of apology. #PriyankaSharma will be released immediately. https://t.co/q2mfzFQTaS
— ANI (@ANI) May 14, 2019
प्रियंका शर्मा यांनी ममता बँनर्जींचे मॉर्फ केलेले एक आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, प्रियंकाच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या जामीन अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रियंका शर्मा यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी अट घातली. प्रियंका शर्मा या एका राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. जर त्याना सामान्य नागरिक असत्या तर या प्रकरणी वेगळा अटला चालला असता, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले. अखेरीस लेखी माफी मागण्याच्या अटीवर प्रियंका यांना जामीन मंजूर करण्यात आला. नंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा करत सशर्त जामिनाची अट रद्द केली.
Supreme Court grants conditional bail to BJP youth wing worker Priyanka Sharma on tendering written apology for putting objectionable picture of West Bengal Chief Minister Mamata Banerjee on social media. pic.twitter.com/ycs67UvA9V
— ANI (@ANI) May 14, 2019
दरम्यान, प्रियंका शर्मा यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या आई राजकुमारी शर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता मला माझ्या मुलीच्या घरी परतण्याची प्रतीक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.
Raj Kumari Sharma, mother of BJP youth wing worker Priyanka Sharma who has been granted conditional bail by SC: I can't express how happy I am. I am awaiting my daughter's return. pic.twitter.com/HE8fjPjY3D
— ANI (@ANI) May 14, 2019