मालेगाव बॉम्बस्फोट: 9 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 10:45 AM2017-08-21T10:45:36+5:302017-08-21T11:05:55+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे

Supreme Court grants bail to Malegaon blast accused Lt Colonel Prasad Shrikant Purohit | मालेगाव बॉम्बस्फोट: 9 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

मालेगाव बॉम्बस्फोट: 9 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Next
ठळक मुद्देमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूरनाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होतापुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होतीराष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने मात्र जामिनाला विरोध केला होता

नवी दिल्ली, दि. 21 - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  9 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आपला हा निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज आपला निर्णय सुनावत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता. 

पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने मात्र जामिनाला विरोध केला होता. पुरोहित यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा असे एनआयएचे म्हणणे होते. न्यायाच्या दृष्टीकोनातून पुरोहितला जामिन मंजूर केला पाहिजे असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी केला होता. मालेगाव प्रकरणात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मिळतो मग पुरोहितला का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. एनआयएची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप साळवे यांनी केला होता. साक्षीदारांच्या साक्षीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात झालेल्या या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहित यांचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. 

एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Web Title: Supreme Court grants bail to Malegaon blast accused Lt Colonel Prasad Shrikant Purohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.