स्वच्छ हवा, श्वास घेऊ द्या, मिठाईवर पैसे खर्च करा; फटाके बंदी हटवण्याच्या मागणीवर SCने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 04:41 PM2022-10-20T16:41:52+5:302022-10-20T16:43:52+5:30
दिल्लीत फटाक्यांवर सरकारने बंदी आणली आहे. या निर्णयाविरोधात दिल्लीतील फटाका व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली आहे.
नवी दिल्ली: दिल्लीत फटाक्यांवर सरकारने बंदी आणली आहे. या निर्णयाविरोधात दिल्लीतील फटाका व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. फटाक्यांवरील बंदी उठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रेत्यांना फटकारले आहे. फटाक्यांचे पैसे मिठाईवर खर्च करण्याचा सल्ला दिला.
लोकांना स्वच्छ हवा, श्वास घेऊ द्या, अशी कडक टिप्पणी न्यायालयाने केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारीच दिल्ली प्रदूषणामुळे सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली. नियंत्रण समितीने विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी लादण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता.
Pension: ...तर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शन आणि ग्रॅच्युइटी, मोदी सरकारने बदलला नियम
दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही फटाके विक्रेत्यांना सुनावले आहे. लोकांना स्वच्छ हवा, श्वास घेऊ द्या आणि तुमचे पैसे मिठाईवर खर्च करा, असा सल्ला दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिल्याचा अर्थ पुढील आदेशापर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळी, छठ यासह सर्व सणांवर फटाक्यांवर बंदी लागू राहणार आहे.
दिल्लीतील ५० हून अधिक परवानाधारक व्यापाऱ्यांनी ग्रीन फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी मागितली होती.या सुनावणीसही कोर्टाने विरोध केला आहे.
सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवणुकीवर आणि विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेला विरोध करताना दिल्ली सरकारने एनजीटीचा निर्णय पाहता फटाक्यांची विक्री करता येणार नाही आणि फटाक्यांच्या साठ्याचीही विक्री करता येणार नाही, असा युक्तिवाद केला होता. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते १४ सप्टेंबर रोजी घातलेली बंदी मनमानी आणि बेकायदेशीर आहे, या बंदीमुळे आमच्या उपजीविकेवर विपरित परिणाम होत आहे, असा या याचिकेत म्हटले होते.