Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court LIVE: मोठी घडामोड! शिंदे-ठाकरे वाद घटनापीठाकडे वर्ग; गुरुवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 12:53 PM2022-08-23T12:53:18+5:302022-08-23T13:07:15+5:30
Supreme Court Hearing Updates LIVE : शिंदे-ठाकरे सुनावणी काल रात्रीपर्यंत आजच्या वेळापत्रकात लिस्टच नव्हती, असे समोर आले आहे. सरन्यायाधीशांनीच हे प्रकरण लिस्ट केले आहे.
एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटामधील शिवसेना कोणाची? बंडखोर आमदार अपात्र आदी याचिकांवर सुनावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील हे महत्वाचे प्रकरण आहे. एकीकडे शिंदे सरकार एकेक पाऊल पुढे टाकत असताना ठाकरेंची शिवसेना मात्र अडकून पडली आहे. यामुळे सरन्यायाधीश आज कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हे प्रकरण आता पाच न्यायधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. याबाबत गुरुवारी सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिका वेगळ्या केल्या जाणार आहेत. एकमेकांत गुंतागुंत वाढल्याने हे घटनापीठ महत्वाचे निर्णय घेईल व निवडणूक आयोगाची देखील जबाबदारी निश्चित करेल.
शिंदे-ठाकरे सुनावणी काल रात्रीपर्यंत आजच्या वेळापत्रकात लिस्टच नव्हती, असे समोर आले आहे. सरन्यायाधीशांनीच हे प्रकरण लिस्ट केले आहे. आजच तारीख देण्यात आली आणि आजच यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. निर्णय येण्याची अपेक्षा वकिलांनी व्यक्त केली आहे. परंतू अर्धा तासच आहे, यामुळे सुनावणी शक्य नसल्याचेही ते म्हणाले होते.
वकील काय म्हणालेले....
सरन्यायाधीश रमणा हे येत्या दोन तीन दिवसांत निवृत्त होणार आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकीय पेच महत्वाचा वाटला असावा. निवृत्तीपूर्वी त्यांना यावर निकाल देणे गरजेचे वाटले असावे म्हणून त्यांनी आज हा विषय पटलावर घेतला, असे वकिलांनी म्हटले आहे. तसेच दुपारी साडेबारा वाजता कोर्ट रुम २ मधील कामकाज संपणार आहे. शिंदे-ठाकरे प्रकरणावर जे न्यायमूर्ती नियुक्त केले आहेत ते कोर्ट रुम २२ मध्ये असणार आहेत. तेथून ते तिकडे येतील आणि सुनावणी घेतील. १ वाजता पुन्हा लंच ब्रेक आणि नंतर पुन्हा दुसरे कामकाज सुरु होणार आहे. यामुळे शिंदे-ठाकरे वादावर फक्त अर्धा तासच मिळणार आहे, असे या वकिलांनी सांगितले.